धनंजय मुंडेंवर बेळगावात गुन्हा दाखल

बेळगाव: महामेळाव्यासाठी परवानगी मागूनही न देणाऱ्या कर्नाटकी पोलीस प्रशासनाने खरा रंग दाखवला आहे. महामेळाव्याला परवानगीच नसताना तो घेतला असे कारण देत महाराष्ट्र विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. धनंजय मुंडेंसह शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे, महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यासह नऊ जणांविरुद्ध टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला …

धनंजय मुंडेंवर बेळगावात गुन्हा दाखल

बेळगाव: महामेळाव्यासाठी परवानगी मागूनही न देणाऱ्या कर्नाटकी पोलीस प्रशासनाने खरा रंग दाखवला आहे. महामेळाव्याला परवानगीच नसताना तो घेतला असे कारण देत महाराष्ट्र विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. धनंजय मुंडेंसह शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे, महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यासह नऊ जणांविरुद्ध टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिवाळी अधिवेशन सुरु असताना संबंधित जागेच्या मालकाकडून, तसेच संबंधित सरकारी कार्यालयातून परवानगी आवश्यक होती, मात्र ती घेतली नाही असा आरोप धनंजय मुंडेंसह सर्वांवर आहे. याशिवाय

पोलीस खात्याकडूनही परवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण करणे, व्यासपीठ उभारणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बंदी झुगारुन धनंजय मुंडे बेळगावात

सीमाभागातील मराठी लोकांच्या लढ्याला बळ देण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे काल बेळगावात दाखल झाले. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास धनंजय मुंडे बेळगावात पोहोचले. कर्नाटक सरकारचे बेळगावमध्ये मंगळवारपासून अधिवेशन सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवारी बेळगावात मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला धनंजय मुंडे यांनी संबोधित केलं.

गेली साठवर्षाहून अधिक काळ बेळगाव सीमाभागातील मराठी जनता महाराष्ट्रात सामील होण्यासाठी लढत आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतरही बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात सहभागी झालेला नाही, हे दुर्दैव आहे. या लढ्याला आता तरुणांनी हाती घ्यावे असे आवाहन धनंजय मुंडे यांनी यावेळी केले.

याशिवाय धनंजय मुंडे म्हणाले, “महाराष्ट्रातील 12 कोटी जनता  सीमाभागातील मराठी जनतेच्या पाठिशी आहे. पुढील काळात सीमा लढा  निर्णायक वळणावर नेण्यात येणार आहे. सीमाभागातील मराठी जनतेवरील अन्याय सहनशक्तीपलीकडे गेला आहे. पवार साहेबांनी सीमा लढ्यासाठी पाठीवर काटी  खाल्ली. कितीही झालं तरी सीमाबांधवाना न्याय मिळवून देणार, असा संदेश शरद पवारांनी दिला आहे, असं यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.

कर्नाटकी वळवळ थांबविणे  ही महाराष्ट्राची जबाबदारी आहे. याकडे लक्ष देऊन पुढील काळात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सीमावासीयांच्या व्यथा मांडल्या जातील. आगामी काळात सीमा लढ्यात आपण सक्रियपणे उतरणार आहोत. कर्नाटक सरकारच्या अन्यायाला त्याच प्रकारे उत्तर दिले जाईल, असंही धनंजय मुंडेंनी नमूद केलं.

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत मराठी उमेदवार निवडून आले नाहीत याची खंत बाळगू नये. बेळगावातील सीमालढा लोकप्रतिनिधी निवडून आणण्याचा नसून, मराठी मातीसाठीचा आहे. बेळगावातील कर्नाटक सरकारचे अधिवेशन बेकायदेशीर असून, महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा हाच कायदेशीर आहे, या लढाईची तीव्रता आता वाढवावी लागेल असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातमी 

प्रोटोकॉल तोडून धनंजय मुंडे मध्यरात्रीच बेळगावात 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *