निवडणूक आयोगाला तुरुंगात टाकण्याची धमकी, प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा दाखल

यवतमाळ : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांवर यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. निवडणूक आयोगाला दोन दिवस जेलमध्ये टाकण्याची धमकी दिल्याने ही कारवाई करण्यात आली. सत्ता मिळाल्यास निवडणूक आयोगालाच तुरुंगात टाकतो, अशी धमकी प्रकाश आंबेडकरांनी दिली होती. पुलवामाची घटना मॅच फिक्सिंग असून, यावर काही बोलले की निवडणूक आयोग रोखतं, ही …

निवडणूक आयोगाला तुरुंगात टाकण्याची धमकी, प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा दाखल

यवतमाळ : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांवर यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. निवडणूक आयोगाला दोन दिवस जेलमध्ये टाकण्याची धमकी दिल्याने ही कारवाई करण्यात आली. सत्ता मिळाल्यास निवडणूक आयोगालाच तुरुंगात टाकतो, अशी धमकी प्रकाश आंबेडकरांनी दिली होती.

पुलवामाची घटना मॅच फिक्सिंग असून, यावर काही बोलले की निवडणूक आयोग रोखतं, ही यंत्रणा भाजपाच्या हातचे बाहुले आहे. आम्हाला सत्तेत येऊ द्या. यांनाही जेलची हवा खायला पाठवू, असे खळबळजनक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं.

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांची प्रचारसभा आयोजित केली होती. मात्र ओवेसी या सभेला आले नाहीत. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या 25 मिनिंटाच्या भाषणात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षावर सडकून टीका केली. त्यात त्यांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला.

VIDEO : पाहा, प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *