दिवाळीत चायना मालची आयात नाही, चीनचं दिवाळं निघणार; 40 हजार कोटीचा फटका बसणार!

यंदा  दिवाळीत लागणाऱ्या वस्तूंची चीनमधून आयात केली जाणार नाही. यामुळे चीनला जवळपास 40 हजार कोटी रुपयांचं नुकसान सहन करावा लागणार आहे.

दिवाळीत चायना मालची आयात नाही, चीनचं दिवाळं निघणार; 40 हजार कोटीचा फटका बसणार!

नागपूर : भारताचा शत्रू असलेल्या चीनला दिवाळीचा दणका देण्याच्या तयारीत (CAT Boycott China Products For Diwali ) भारतीय व्यापारी दिसत आहेत. यंदा  दिवाळीत लागणाऱ्या वस्तूंची चीनमधून आयात केली जाणार नाही. यामुळे चीनला जवळपास 40 हजार कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागणार आहे. व्यापाऱ्यांची संगटना कॅटने याबाबतचा निर्णय घेतला आहे (CAT Boycott China Products For Diwali ).

चीन भारताला वारंवार डोळे दाखविण्याचं काम करत आहे. भारताच्या भूमीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या सैनिकांशी वारंवार समोरासमोर येतो. मात्र, भारताच्या बाजारपेठेत आपला माल विकून कोट्यवधीचा फायदाही करुन घेतो. मात्र, आता याला प्रतिबंध घालण्याचा निर्णय भारतातील व्यापाऱ्यांनी घेतला असून यासाठी कॅट म्हणजे कॉन्फड्रेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने पुढाकार घेतला असून देशभरातील व्यापाऱ्यांनी याला प्रतिसाद दिला आहे.

यासाठी कॅटने देशभरात मोहीम आखली आणि चिनी वस्तू बॅन करुन देशी वस्तूला प्राधान्य देण्यात आलं. यामुळे देशातील व्यापार तर वाढेलच सोबतच देशाचा पैसा देशात राहील. चीन ज्या देशातून मोठ्या प्रमाणात पैसा कमावतो त्याच देशाच्या सैनिकांना मारण्यासाठी तो पैसे वापरतो. त्यामुळे चीनच्या वस्तू न विकण्याची आणि आयात न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे (CAT Boycott China Products For Diwali ).

दिवाळी हा भारतातील सगळ्यात मोठा सण आहे. या सणाला भारतीय मोठ्या प्रमाणात खरेदी करतात दिवाळीच्या जास्तीतजास्त वस्तू चीनच्या असतात. जवळपास दिवाळीच्या काळात चीन 40 हजार कोटीचा व्यवसाय भारतात करतो. त्यामुळे त्याचा मोठा फायदा होतो. मात्र, आता व्यापारीच चीनला दणका देण्याच्या तयारीत असल्याने चीनला मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे. मात्र, याला किती प्रतिसाद मिळतो, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे.

CAT Boycott China Products For Diwali

संबंधित बातम्या :

चीन तैवानवर हल्ला करणार? वाचा ड्रॅगनचा संपूर्ण ‘गेम प्लॅन’

सव्वाशे कोटी नागरिकांनी चीनची एकही वस्तू वापरु नये, चीन जागेवरच येईल : अजित पवार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *