जनावरं चोरणारी टोळी सक्रीय, गुंगीचं इंजेक्शन देऊन गुरांची चोरी, अंधारात फिरणाऱ्या गाडीचा धुमाकूळ

रायगड जिल्ह्यातील उरण भागात सध्या गुरे-ढोरे चोरणाऱ्या टोळीच्या तवेरा गाडीची दहशत आहे (Cattle-stealing gang active in Uran).

जनावरं चोरणारी टोळी सक्रीय, गुंगीचं इंजेक्शन देऊन गुरांची चोरी, अंधारात फिरणाऱ्या गाडीचा धुमाकूळ

रायगड : जिल्ह्यातील उरण भागात सध्या गुरे-ढोरे चोरणाऱ्या टोळीच्या तवेरा गाडीची दहशत आहे (Cattle-stealing gang active in Uran). उरण तालुक्यात मागील काही दिवस या जनावरं चोरणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. ही टोळी रात्रीच्या अंधारात तवेरा गाडी घेऊन परिसरात फिरते. अशाच प्रकारे बोरी नाका येथे भर रस्त्यावर गाडी उभी करुन पांढऱ्या रंगाच्या गाई चोरीचा प्रयत्न झाला. यावेळी दक्ष नागरिकांनी त्यांना घरातूनच शिव्यांची लाखोळ वाहिल्याने ही टोळी पळून गेली.

सोशल मीडियावर उरणमधील या जनावर चोरीच्या घटनांचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. मात्र, उरण पोलिसांचं याकडे अद्याप दुर्लक्षच झालेलं दिसत आहे. पोलिसांकडून या घटनांबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. जनावर चोरीचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यातूनच उरणच्या उरण-मोरा रस्त्यावरील बोरी नाका येथे देखील अशीच घटना झाल्याचं समोर आलं. अशाच प्रकारे मागील आठवड्यातच करंजा परिसरात एका तवेरा गाडीतून जनावर चोरीचा प्रयत्न झाला. या चोरांनी गुरांना गुंगीचे इंजेक्शन मारुन पळवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

कारंजा येथील रस्त्यावर अशाच प्रकारे गुंगी आलेली एक गाय पडलेली आढळली. या दोन्ही प्रकारांमुळे उरण तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही वर्षांपूर्वीही अशाच प्रकाराची गुरे ढोरे चोरणाऱ्यांनी या भागात अगदी दहशत माजवली होती. त्यावेळी नागरिकांनी पाळत ठेवून संबंधितांना हुसकावले होते. त्यामुळे काही महिने बंद असलेला हा प्रकार आता पुन्हा उफाळून आला आहे. गुरे चोरण्यासाठी येणाऱ्या या तवेरा गाडीला आणि त्यातील हरामी लोकांना पोलीस यंत्रणा पकडणार का असा सवाल या ठिकाणी विचारला जात आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

प्रशासकीय यंत्रणा सध्या कोरोना महामारीच्या निमित्ताने व्यस्त आहे. यात पोलिसांवरही कामाचा मोठा ताण आहे. त्यातच नागरिकही या जागतिक महामारीच्या तणावात असल्याने ते जागे असण्याचं प्रमाण कमी आहे. याचाच फायदा उचलत या चोरांनी उरण तालुक्यात रात्रीच्या अंधारात तवेरा गाडी घेऊन धुमाकूळ घातला आहे. या गाडीच्या पाठीमागच्या सीट्स काढलेल्या आहेत. तेथे गुंगी दिलेल्या दोन गाई किंवा बैल आरामात बसतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. रात्री सुमारे एक ते दीडच्या सुमारास ही गाडी आणि चोर येत असल्याची माहिती नागरिकांनी दिली. हे गुरे ढोरे चोर हत्यारबंद असल्याचा संशय असल्याने कोणीही सामान्य नागरिक यांना थेट आडवा जाण्याचे धाडस दाखवत नाहीत.

काही वर्षांपूर्वी तर विंधणे येथील रस्त्यावर अशीच एक गाडी थांबवून तबेल्यात बांधला गेलेला घोडाच सोडून घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला. मात्र मालकांनी जाग आल्याने आरडा ओरडा केला. त्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला. मागील काही दिवस या चोरांनी उरण शहर आणि परिसरात धिंगाणा घालणे सुरु केल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी उरणच्या बोरी नाक्यावर अशाच प्रकारे तवेरा गाडीतून गाय चोरीचा प्रयत्न झाला. मात्र, शेजारी असलेल्या इमारतीतील नागरीकांनी त्यांना हटकले आणि जोरदार शिवीगाळ करत विरोध केला. यानंतर चोर गाडीसह पळून गेल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

वाईन शॉपची तुलना विद्यापीठांशी कशाला? परीक्षा घेऊ शकत नाही, ठाकरे सरकारची रोखठोक भूमिका

Pune Lockdown | सरकारनं अफू घेऊन निर्णय घेतलाय का? पुणे लॉकडाऊनवर मनसेचा सवाल

…तर राष्ट्रवादीच्या 20 आणि काँग्रेसच्या 10 जागा आल्या असत्या : चंद्रकांत पाटील

Cattle-stealing gang active in Uran

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *