Special Trains | महाराष्ट्रासाठी खूशखबर, 11 ऑक्टोबरपासून 8 विशेष रेल्वे सुरु होणार

मध्य रेल्वेने 11 ऑक्टोबरपासून महाराष्ट्र राज्यात आणखी 8 जोड्या विशेष गाड्या सुरु करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या पूर्णपणे आरक्षित गाड्या म्हणून धावणार आहेत (Central Railway start 8 special trains for Maharashtra.

Special Trains | महाराष्ट्रासाठी खूशखबर, 11 ऑक्टोबरपासून 8 विशेष रेल्वे सुरु होणार
Follow us
| Updated on: Oct 08, 2020 | 9:09 PM

मुंबई : मध्य रेल्वेने 11 ऑक्टोबरपासून महाराष्ट्र राज्यात आणखी 8 जोड्या विशेष गाड्या सुरु करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या पूर्णपणे आरक्षित गाड्या म्हणून धावणार आहेत (Central Railway start 8 special trains for Maharashtra. यात मुंबई-कोल्हापूर विशेष, श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर-गोंदिया विशेष आणि मुंबई-हजूर साहिब नांदेड विशेष या गाड्या दररोज असणार आहेत. पुणे-नागपूर वातानुकूलित विशेष, पुणे-अजनी विशेष वातानुकूलित, पुणे-अमरावती वातानुकूलित विशेष, अजनी-पुणे विशेष वातानुकूलित या गाड्या साप्ताहिक असणार आहेत. मुंबई-लातूर सुपरफास्ट विशेष आठवड्यातून 4 दिवस धावणार आहे.

1. मुंबई-कोल्हापूर विशेष दैनिक

01029 विशेष ट्रेन 13 ऑक्टोबर 2020 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज सुटेल आणि त्याच दिवशी कोल्हापूरला पोहोचेल. 01030 विशेष गाडी 12 ऑक्टोबर 2020 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत कोल्हापूर येथून दररोज सुटेल आणि त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल.

थांबे आणि वेळ : कराड, कर्जत, तारगाव, टाकरी, वालिवडे आणि घोरपडी थांबे वगळता नियमित गाडी क्रमांक 11029/ 11030 कोयना एक्स्प्रेसप्रमाणे.

संरचनाः 1 तृतीय वातानुकूलित, 2 वातानुकूलित चेअर कार, 2 शयनयान, 10 द्वितीय आसन श्रेणी.

2. मुंबई-लातूर सुपरफास्ट विशेष (आठवड्यातून 4 दिवस).

02207 सुपरफास्ट विशेष गाडी 11 ऑक्टोबर 2020 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि रविवारी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी लातूर येथे पोहोचेल. 02208 सुपरफास्ट विशेष 12 ऑक्टोबर 2020 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत लातूर येथून दर सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी पोहोचेल.

थांबे आणि वेळ : लोणावळा, मुरुड आणि हारंगुल थांबे वगळता नियमित गाडी क्रमांक 22107/22108 लातूर सुपरफास्ट एक्सप्रेसप्रमाणे. संरचना : 1 प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, 1 द्वितीय वातानुकूलित, 2 तृतीय वातानुकूलित, 8 शयनयान, 6 द्वितीय आसन श्रेणी.

3. पुणे-नागपूर वातानुकूलित विशेष साप्ताहिक

01417 विशेष वातानुकूलित साप्ताहिक ट्रेन 15 ऑक्टोबर 2020 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर गुरुवारी पुणे येथून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी नागपूरला पोहोचेल. 01418 विशेष वातानुकूलित साप्ताहिक 16 ऑक्टोबर 2020 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत नागपूर येथून प्रत्येक शुक्रवारी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पुण्याला पोहोचेल.

थांबे आणि वेळ : नियमित गाडी क्रमांक 11417/11418 हमसफर वातानुकूलित एक्स्प्रेसप्रमाणे. संरचना : 13 तृतीय वातानुकूलित.

4. पुणे-अजनी विशेष वातानुकूलित साप्ताहिक

02239 विशेष वातानुकूलित साप्ताहिक ट्रेन 17 ऑक्टोबर 2020 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर शनिवारी पुण्याहून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी अजनीला पोहोचेल. 02240 विशेष वातानुकूलित साप्ताहिक 18 ऑक्टोबर 2020 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत अजनी येथून दर रविवारी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पुण्याला पोहोचेल.

थांबे आणि वेळ : नियमित ट्रेन क्रमांक 22139/22140 वातानुकूलित एक्स्प्रेस प्रमाणे. संरचना : 13 तृतीय वातानुकूलित.

5. पुणे-अमरावती वातानुकूलित विशेष साप्ताहिक

02117 विशेष वातानुकूलित साप्ताहिक ट्रेन 14 ऑक्टोबर 2020 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर बुधवारी पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी अमरावतीला पोहोचेल. 02118 विशेष वातानुकूलित साप्ताहिक 15 ऑक्टोबर 2020 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत अमरावती येथून दर गुरुवारी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पुण्याला पोहोचेल.

थांबे आणि वेळ : नियमित ट्रेन क्रमांक 22117/22118 सुपरफास्ट वातानुकूलित एक्स्प्रेसप्रमाणे. संरचना : 1 प्रथम वातानुकूलित, 4 द्वितीय वातानुकूलित, 9 तृतीय वातानुकूलित.

6. अजनी-पुणे विशेष वातानुकूलित साप्ताहिक

02224 विशेष वातानुकूलित साप्ताहिक 13 ऑक्टोबर 2020 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत अजनी येथून दर मंगळवारी सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी पोहोचेल. 02223 विशेष वातानुकूलित साप्ताहिक ट्रेन 16 ऑक्टोबर 2020 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत पुण्याहून प्रत्येक शुक्रवारी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी अजनीला पोहोचेल.

थांबे आणि वेळ : नियमित गाडी क्रमांक 22123/22124 वातानुकूलित सुपरफास्ट एक्स्प्रेसप्रमाणे. संरचना : 1 प्रथम वातानुकूलित, 4 द्वितीय वातानुकूलित, 9 तृतीय वातानुकूलित.

7. श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर – गोंदिया विशेष दैनिक

01039 विशेष 11 ऑक्टोबर 2020 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरहून दररोज सुटेल आणि दुसर्‍या दिवशी गोंदियाला पोहोचेल. 01040 विशेष ट्रेन 13 ऑक्टोबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत गोंदिया येथून दररोज सुटेल आणि दुसर्‍या दिवशी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला पोहोचेल.

थांबे आणि वेळ : सेवाग्राम, चांदूर, जलंब, पुणतांबा, जरंडेश्वर, तारगाव, मसूर, भवानी नगर, टाकरी आणि वालिवडे थांबे वगळता नियमित रेल्वे क्रमांक 11039/11040 महाराष्ट्र एक्स्प्रेस प्रमाणे.

संरचना : 1 द्वितीय वातानुकूलित, 2 तृतीय वातानुकूलित, 9 शयनयान, 5 द्वितीय आसन श्रेणी.

8. मुंबई-हजूर साहिब नांदेड विशेष दैनिक

01141 विशेष 11 ऑक्टोबर 2020 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज निघेल आणि दुसर्‍या दिवशी हजुर साहिब नांदेडला पोहोचेल. 01142 विशेष 12 ऑक्टोबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत हजुर साहिब नांदेड येथून दररोज रवाना होईल आणि दुसर्‍या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे : दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, लासलगाव, मनमाड, नगरसोल, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी आणि पूर्णा. संरचना : 1 प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, 1 द्वितीयसह तृतीय वातानुकूलित, 2 तृतीय वातानुकूलित, 10 शयनयान, 4 द्वितीय आसन श्रेणी.

आरक्षण : 01029/01030 विशेष, 02207/02208 सुपरफास्ट विशेष, 02224/02223 वातानुकूलित विशेष, 01039 आणि 01141 विशेष गाड्यांचे आरक्षण 9 ऑक्टोबरपासून सुरू होतील. 01417/ 01418, 02117/02118 आणि 02239/02240 विशेष वातानुकूलित गाड्यांचे आरक्षण 11 ऑक्टोबरपासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरु होतील.

केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाशांना या विशेष गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड 19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे, असं आवाहन रेल्वे विभागाने केलं आहे.

संबंधित बातम्या :

Indian Railway: खूशखबर! नवरात्रीपूर्वीच धावणार 78 स्पेशल ट्रेन; जाणून घ्या, संपूर्ण लिस्ट

Indian Railway: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, 12 सप्टेंबरपासून 80 स्पेशल ट्रेन सुरु होणार

Ganesh Chaturthi 2020 | दर्शनासाठी घरोघरी जाणे टाळा, सामूहिक आरतीही नको, कोकणातील गणेशोत्सवासाठी गाईडलाईन्स जारी

Central Railway start 8 special trains for Maharashtra amid Corona Lockdown

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.