सीईटी परीक्षांच्या तारखा जाहीर, 31 मार्चपर्यंत करता येणार अर्ज

सीईटी परीक्षांच्या तारखा जाहीर, 31 मार्चपर्यंत करता येणार अर्ज
उदय सामंत

येत्या शैक्षणिक वर्षातील सीईटी परीक्षेसाठी (CET exam) विविध अभ्यासक्रमांची नोंदणी प्रक्रिया सीईटी सेलमार्फत (CET cell) सुरू आहे. सीईटी सेलकडून शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग तसेच कलाशिक्षण विभागाच्या सीईटीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Mar 27, 2022 | 7:43 AM

मुंबई : येत्या शैक्षणिक वर्षातील सीईटी परीक्षेसाठी (CET exam) विविध अभ्यासक्रमांची नोंदणी प्रक्रिया सीईटी सेलमार्फत (CET cell) सुरू आहे. सीईटी सेलकडून शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग तसेच कलाशिक्षण विभागाच्या सीईटीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. उच्चा शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दिनांक तीन ते दहा जून 2022, तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा दिनांक आकरा ते आठ्ठावीस जून तर कलाशिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा बारा जून 2022 रोजी घेण्यात येणार आहेत. अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली. यासोबतच अभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षांची माहिती पुस्तिका वेळापत्रक व परीक्षेत बदल झाल्यास त्याची माहिती संबंधित वेबसाईटवर देण्यात येणार असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.

लाखो विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

सध्या सीईटी सेलकडून या परीक्षासाठी नोंदणी सुरू आहे. तीन्ही विभागांचे मिळून आतापर्यंत एकूण 4 लाख 58 हजार 721 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर यापैकी 3 लाख 70 हजार 304 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केले आहेत. उर्वरीत 88 हजार विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली नाहीये. दरम्यान अर्ज भरताना विद्यार्थ्यांना ज्या अडचणी येत आहेत, त्याचे निरासरन सीईटी सेलकडून करण्यात येत आहे.

कोरोनाच्या नियमांचे पालन करून परीक्षा

सध्या कोरोनाची लाट वसरली आहे. कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होत आहे. मात्र तरी देखील प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात येत आहे. या सर्व परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम काटेकोरपणे पाळूनच घेतल्या जाणार आहेत. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना सूचना देण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या

चीनच्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्याचा विचार करताय, UGC नं विद्यार्थ्यांना दिलेला इशारा नक्की वाचा

Supreme Court : दिव्यांगांसाठी खुशखबर, दिव्यांगही IPSसाठी अर्ज करू शकतात, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

आता जिल्हा परिषदेच्या शाळांवर CCTV ची नजर, वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें