राष्ट्रवादीच्या ताब्यातील नगर परिषदेत सेनेच्या नगरसेविकेस सभापतीपद; धनंजय मुंडे शब्दाला जागले

या फेरनिवडीमध्ये धनंजय मुंडे यांनी सर्व जाती-धर्मांवर न्याय करतच महाविकास आघाडीच्या धर्माचेही पालन केल्याचे दिसून आले.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:38 PM, 22 Jan 2021
राष्ट्रवादीच्या ताब्यातील नगर परिषदेत सेनेच्या नगरसेविकेस सभापतीपद; धनंजय मुंडे शब्दाला जागले
Dhananjay Munde

परळी : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी नगर परिषदेच्या सभापती निवडींमध्ये महाविकास आघाडी धर्म पाळत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असूनही शिवसेनेच्या एकमात्र नगरसेविकेस सभापतीपद दिले. त्यामुळे बीडच्या राजकारणात हा चर्चेचा विषय ठरत आहे. परळी नगर परिषदेच्या विषय समित्यांची आज फेरनिवड संपन्न झाली, या फेरनिवडीमध्ये धनंजय मुंडे यांनी सर्व जाती-धर्मांवर न्याय करतच महाविकास आघाडीच्या धर्माचेही पालन केल्याचे दिसून आले. (Chairman Of The Sena Corporator In The NCP Controlled Municipal Council; Dhananjay Munde Decision)

परळी नगर परिषदेत एकूण 32 निवडून आलेले आणि 3 स्वीकृत असे एकूण 35 नगरसेवक आहेत. यांपैकी जवळपास 30 नगरसेवक एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तर गंगासागर शिंदे या एकमेव शिवसेनेच्या नगरसेविका आहेत.

शिवसेनेच्या एकमात्र नगरसेविका गंगासागर बाबुराव शिंदे यांना महिला आणि बालविकास सभापतीपद

विषय समित्यांच्या फेरनिवडणुकीत शिवसेनेच्या एकमात्र नगरसेविका गंगासागर बाबुराव शिंदे यांना महिला आणि बालविकास सभापतीपद देण्यात आले. याशिवाय अन्नपूर्णा आडेपवार यांना बांधकाम, उर्मिला गोविंद मुंडे यांना पाणीपुरवठा, शेख अन्वरलाल यांना स्वच्छता समिती, गोपाळकृष्ण आंधळे यांना शिक्षण समिती या सर्व सभापती पदांसह स्थायी समितीवर बाजीराव भैय्या धर्माधिकारी, शहाजहान बेगम समीउल्ला खान आणि रेश्मा बळवंत यांच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्यात. यावेळी नगराध्यक्षा सरोजनीताई हालगे, उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, न.प. मुख्याधिकारी अरविंद मुंडे तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांनी या प्रक्रियेत पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.

धनंजय मुंडेंचे परळी मतदारसंघ ग्रामपंचायत निवडणुकीत एकेरी वर्चस्व

दरम्यान एकीकडे आपल्यावर झालेल्या आरोपांचा सामना करत असताना धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीत एकेरी वर्चस्व मिळवले; त्यापाठोपाठ आता नगर परिषद विषय समित्यांच्या निवडींमध्ये महाविकास आघाडीचा धर्म पाळून व सर्व जाती धर्मांना समान न्याय देण्याची भूमिका बजावून आपल्यातील सोशल इंजिनिअरिंग सह पॉलिटिकल इंजिनिअरिंगचेही दर्शन घडवले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही!

संबंधित बातम्या

धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा, रेणू शर्मांकडून बलात्काराची तक्रार मागे

बहुजन समाजातून आलेल्या धनंजयला नाहक त्रास, अजित पवार भरभरुन बोलले

Chairman Of The Sena Corporator In The NCP Controlled Municipal Council; Dhananjay Munde Decision