श्रावण महिना सुरु झाला, मंदिरं खुली करा, चंद्रकांत खैरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे (Chandrakant Khaire letter to CM Uddhav Thackeray).

श्रावण महिना सुरु झाला, मंदिरं खुली करा, चंद्रकांत खैरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Follow us
| Updated on: Jul 22, 2020 | 6:22 PM

औरंगाबाद : शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे (Chandrakant Khaire letter to CM Uddhav Thackeray). “श्रावण महिना सुरु झाला आहे. सणवारांचा हा महिना आहे. त्यामुळे मंदिरं खुली करा, मंदिरात धार्मिक कार्यक्रम आणि विधी करण्यास परवानगी द्या”, अशी विनंती चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रामार्फत केली आहे (Chandrakant Khaire letter to CM Uddhav Thackeray).

“आता श्रावण महिना सुरु झाला आहे. गेल्या चार महिन्यांपासून पूजापाठ बंद आहे. निदान श्रावण महिन्यात तरी महादेवांचं दर्शन आणि पूजन व्हायला हवं. श्रावण महिन्यात महादेवाचं पूजन आणि दर्शनाला खूप महत्त्व असतं. त्यामुळे श्रावण महिन्यात लाखो नागरिक महादेवाची पूजा करतात आणि मंदिरात दर्शनासाठी जातात”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी ‘टीव्ही9 मराठी’सोबत बोलताना दिली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“सोशल डिस्टन्सिंग पाळून भाविकांना मंदिरात सोडलं जावं. भाविकांना महादेवाच्या पिंडावर निदान बेलाचं पान वाहता यावं. महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंग आहेत. सर्व ज्योतिर्लिंगांची पूजा करुन कोरोना नष्ट व्हावा, अशी प्रार्थना करु. पूजेसाठी नियम पाळता येतील. सोशल डिस्टिन्सिंग पाळून धार्मिक विधी करता येतील”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मात्र, अनेक भागांमध्ये लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. अर्थव्यवस्था आणि जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा याचा विचार करुन ही शिथिलता देण्यात आली आहे. अनेक भागात सम-विषयी पद्धतीने दुकानं उघडतात.

हेही वाचा : Sharad Pawar | 6 वेळा विधानसभा, 1 विधानपरिषद, 7 लोकसभा, दोनदा राज्यसभा, पवारांना सोळावी शपथ

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजार 281 कोरोना रुग्ण आढळले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आता औरंगाबादमधील प्रत्येक व्यापारी आणि दुकानदारांची कोरोना टेस्ट केली जात आहे. कोरोना टेस्ट केल्याशिवाय दुकान उघडण्यास बंदी घालण्यात आली आहे.

दुसरीकडे राज्यात ‘मिशन बिगीन अगेन’ची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे राज्यात आता पुन्हा लॉकडाऊन होणार नाही. जास्तीत जास्त गोष्टी पुन्हा सुरु केल्या जातील. महाराष्ट्रात पुन्हा जिम, शॉपिंग मॉल सुरु करावेत का, याबाबत सध्या सरकार विचार करत आहे. मात्र लोकल ट्रेन सुरु करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

हेही वाचा : जिम गरजेचीच, मॉल सुरु करण्याचाही विचार, लोकलबाबत मुख्यमंत्री ठरवतील : राजेश टोपे

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.