प्रचाराच्या धामधुमीत जेव्हा चंद्रकांत दादा आणि सुप्रिया ताई भेटतात...

बारामती : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सध्या बारामतीत तळ ठोकून आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 10 मतदारसंघांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. रामनवमी निमित्त पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील बांडेवाडी या गावातील यात्रेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि चंद्रकांत पाटील यांची समोरासमोर भेट झाली. सुप्रिया सुळे आणि चंद्रकांत पाटील सध्या बारामती मतदारसंघातील गावागावामध्ये जाऊन प्रचार करत आहेत. याचवेळी बांडेवाडेमध्ये …

प्रचाराच्या धामधुमीत जेव्हा चंद्रकांत दादा आणि सुप्रिया ताई भेटतात...

बारामती : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सध्या बारामतीत तळ ठोकून आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 10 मतदारसंघांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. रामनवमी निमित्त पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील बांडेवाडी या गावातील यात्रेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि चंद्रकांत पाटील यांची समोरासमोर भेट झाली.

सुप्रिया सुळे आणि चंद्रकांत पाटील सध्या बारामती मतदारसंघातील गावागावामध्ये जाऊन प्रचार करत आहेत. याचवेळी बांडेवाडेमध्ये सुप्रिया सुळे आणि चंद्रकांत पाटील दोघेही हजर होते. सुप्रिया सुळे त्यांचा प्रचार आटोपून निघाल्या होत्या. पण चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंना आवाज देऊन बोलावलं आणि खुशाली जाणून घेतली.

बारामतीसाठी भाजपकडून रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कांचन कुल यांचं माहेर बारामतीच आहे. त्यामुळे ही लढत आणखी रंगतदार होणार आहे. सुप्रिया सुळेंनीही प्रचाराचा धडाका सुरु केलाय, तर भाजपकडूनही जोरदार प्रचार सुुरु आहे.

बारामतीसाठी महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. बारामतीसह जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर हातकणंगले अशा एकूण 14 जागांसाठी मतदान होणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *