“चंद्रकांत पाटलांना कोथरुडमधून निवडून आणलं, आता कोल्हापुरातूनही आणतो”

चंद्रकांत पाटलांना कोथरुडमधून निवडून आणलं, आता कोल्हापुरातूनही आणतो, असं माजी खासदार संजय काकडे म्हणालेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:11 PM, 20 Jan 2021
"चंद्रकांत पाटलांना कोथरुडमधून निवडून आणलं, आता कोल्हापुरातूनही आणतो"
दिग्विजय सिंह यांनी 1.11 लाख रुपये आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी 11 चांदीच्या विटा या राम मंदिरासाठी दिल्या आहेत? की एखाद्या पक्षाला वर्गणीच्या रुपात दिल्या आहेत ? हे काँग्रेसने आपल्या नेत्यांना सुद्धा विचारावं, असा प्रतिप्रश्नही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला विचारला.

पुणेः पुणे महापालिका निवडणुकीवरून जोरदार राजकारण सुरू झालंय. त्यावर आता माजी खासदार संजय काकडेंनी सूचक विधान केलंय. चंद्रकांत पाटलांना कोथरुडमधून निवडून आणलं, आता कोल्हापुरातूनही आणतो, असं माजी खासदार संजय काकडे म्हणालेत. टीव्ही 9 मराठीशी संजय काकडे यांनी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते. (Chandrakant Patil Was Elected From Kothrud, Now He Is Also Brought From Kolhapur Says Sanjay Kakade)

चंद्रकांत पाटील जर म्हणाले की, मी पुढील निवडणूक कोल्हापूरमधून लढवणार आहे. तर त्यांना नक्कीच निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेन, असंही संजय काकडे म्हणालेत. चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरातून निवडणूक लढवली तर त्यांना 100% निवडून आणू. त्यांचा प्रचारप्रमुख पण मी होईन. कोथरूडमध्ये पण प्रचाराची माझ्याकडेच जबाबदारी होती, हेसुद्धा संजय काकडेंनी अधोरेखित केलंय.

भाजपचा कोणताही सदस्य नाराज नाही: संजय काकडे
“भाजपचा कोणताही सदस्य नाराज नाही. प्रत्येक पक्षात नाराजी असते. त्यामुळे 19 नगरसेवक फुटतील असं शक्य नाही. निवडणुका समोर आल्या की अशा चर्चा समोर येत असतात. आमच्या विरोधी पक्षाने अशा चर्चा केल्या असतील,” असे संजय काकडे म्हणाले.

आमच्या विरुद्ध तीन तीन पैलवान एकत्र आले, तरी आम्हीच पुण्याची महापालिका जिंकू : चंद्रकांत पाटील

जनता आमच्या सोबत आहे. त्यामुळे आमच्या विरुद्ध तीन तीन पैलवान एकत्र आले, तरी आम्हीच पुण्याची महापालिका जिंकू याबद्दल माझ्या मनात शंका नाही,” असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली होती. “मराठा आरक्षण प्रश्नी केंद्राचा काही रोल नाही. हा राज्याचा विषय आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जो बदल केला आहे, तो केंद्राने कायदा करण्याच्या अगोदर केलेला आहे,” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

संबंधित बातम्या

आमच्याविरुद्ध तीन पैलवान एकत्र, तरी आम्ही पुणे महापालिका जिंकू : चंद्रकांत पाटील

पुण्यात 19 नगरसेवक भाजपला रामराम करण्याची चर्चा, भाजपने चर्चा फेटाळली

Chandrakant Patil Was Elected From Kothrud, Now He Is Also Brought From Kolhapur Says Sanjay Kakade