Tik-Tok वर प्रसिद्धीसाठी कुत्र्याला तलावात फेकलं, तक्रारीनंतर तरुणाचा माफीनामा

या युवकाने Tik-Tok वर प्रसिद्ध होण्यासाठी कुत्र्याचे पाय धरून त्याला तलावात फेकतानाचा व्हिडीओ तयार केला होता. व्हिडीओ अपलोड होताच चंद्रपूरकरांनी या अमानवीय घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला.

Tik-Tok वर प्रसिद्धीसाठी कुत्र्याला तलावात फेकलं, तक्रारीनंतर तरुणाचा माफीनामा

चंद्रपूर : Tik-Tok वर क्रूर व्हिडीओ अपलोड करणाऱ्या युवकाबाबत चंद्रपुरातील ‘प्यार फाउंडेशन’ या संस्थेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती (Dog Thrown In lake). या युवकाने Tik-Tok वर प्रसिद्ध होण्यासाठी कुत्र्याचे पाय धरून त्याला तलावात फेकतानाचा व्हिडीओ तयार केला होता. व्हिडीओ अपलोड होताच चंद्रपूरकरांनी या अमानवीय घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर ‘प्यार फाउंडेशन’च्या तक्रारीनंतर या युवकाने या प्रकरणी माफीनामा दिला आहे (Chandrapur Tik-Tok Video).

सोशल नेटवर्किंग साईटवर प्रसिद्धी मिळविण्याकरिता आजचा युवावर्ग काहीतरी वेगळं करायचं प्रयत्न करत असतो. यामध्ये अजाणतेपणे स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या जीवाशी खेळ खेळला जातो. यामध्ये अनेकदा अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, अनेकांना कायमचं अपंगत्वही आलं, तर अनेकदा यामध्ये मुक्या प्राण्यांच्या जीवाची बाजीही लावण्यात आली. अशाच प्रकारचा आणखी एक क्रूर व्हिडीओ Tik-Tok वर एका चंद्रपूरच्या एका युवकाने व्हायरल केला.

शहरातील रामाळा तलावाच्या पाळीवर असलेल्या एका कुत्र्याला या युवकाने दोन्ही पायाने पकडून अचानक पाण्यात फेकले. याचा Tik-Tok वर व्हिडीओला फिल्मी संवादाची जोड दिली. हा व्हीडिओ व्हायरल होताच, लोकांनी यावर संताप व्यक्त केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चंद्रपूरच्या प्राणी संरक्षणाशी निगडीत ‘प्यार फाउंडेशन’ने पुढाकार घेत चंद्रपूर शहर ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत शहर पोलिसांनी त्या युवकाला बोलवून समज दिली. युवकाने असा व्हिडीओ किंवा असे कृत्य पुन्हा करणार नाही, याची ग्वाही देत माफीनामा दिला.

Tik-Tok वरील या व्हिडीओबाबत टोकाच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी मुक्या जनावरांशी खेळ योग्य नाही, असं मत व्यक्त केलं जात आहे.

Tik-Tok Video of Dog thrown in lake

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *