शेतकऱ्याच्या फसवणुकीप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात आरोपपत्र दाखल

बीड : शेतकऱ्याच्या फसवणूक प्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि आणखी दोघांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई जिल्हा आणि सत्र न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं. पूस येथे जगमित्र साखर कारखान्यास दिलेल्या जमिनीच्या मोबदल्यापोटी 40 लाख रुपयांचा धनादेश न वटल्याने या प्रकरणी न्यायालयाच्या निर्देशानंतर पोलिसांनी हे दोषारोपपत्र दाखल केलं. कारखान्याच्या जमिनीच्या …

, शेतकऱ्याच्या फसवणुकीप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात आरोपपत्र दाखल

बीड : शेतकऱ्याच्या फसवणूक प्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि आणखी दोघांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई जिल्हा आणि सत्र न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं. पूस येथे जगमित्र साखर कारखान्यास दिलेल्या जमिनीच्या मोबदल्यापोटी 40 लाख रुपयांचा धनादेश न वटल्याने या प्रकरणी न्यायालयाच्या निर्देशानंतर पोलिसांनी हे दोषारोपपत्र दाखल केलं.

कारखान्याच्या जमिनीच्या व्यवहाराचे 40 लाख रुपये तळणी येथील शेतकरी मुंजा गीते यांना साखर कारखान्याकडून येणे होते. मात्र त्यासाठीचा 40 लाख रुपयांचा धनादेश गीते यांना देण्यात आला. हा धनादेश वठवण्यासाठी तब्बल तीन वर्षे गीते यांनी बँकेचे खेटे मारले. मात्र तीन वर्षे पाठपुरावा करूनही त्यांना या धनादेशाची 40 लाख रुपयांची रक्कम मिळाली नाही. यादरम्यान धनंजय मुंडे यांना पैसे देण्यासंदर्भात अनेक वेळा विनंती करूनही त्याचा काही उपयोग झाला नाही.

या प्रकरणी पोलिसांकडून अंबाजोगाई जिल्हा आणि सत्र न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आलं. कलम 420 (फसवणूक), 465 (बनावटपणा), 468 (फसवणुकीच्या उद्देशाने खोटेपणा करणे), 471 आणि 419 (फसवणुकीसाठी शिक्षा) या कलमाचा यात समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये या प्रकरणाची पहिली तारीख असणार आहे.

काय आहे प्रकरण?

तळणी येथील शेतकरी मुंजा गीते यांची जमीन साखर कारखाना उभारणीसाठी घेण्यात आली होती. मात्र, मोबदला म्हणून त्यांना दिलेला 40 लाख रुपयांचा धनादेश न वठल्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासह इतरांवर बर्दापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, कारवाई होत नसल्याने गीते यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. कोर्टाच्या आदेशानंतर धनंजय मुंडेंसह इतर दोघांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *