सांगलीत शिवरायांची महारांगोळी, एकाचवेळी 9 विश्वविक्रम!

सांगली : शिवजयंती दिनानिमित्त सांगलीमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची विश्वविक्रमी अशी रांगोळी साकारण्यात आली आहे. ही महारांगोळी काढण्यासाठी तब्बल 80 कलाशिक्षक 100 तास अहोरात्र झटले असून एकाच वेळी 9 वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये या रांगोळीची नोंद केली जाणार आहे. तसेच वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्येही या महारांगोळीची नोंद होणार आहे. सांगलीच्या छत्रपती शिवाजी […]

सांगलीत शिवरायांची महारांगोळी, एकाचवेळी 9 विश्वविक्रम!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

सांगली : शिवजयंती दिनानिमित्त सांगलीमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची विश्वविक्रमी अशी रांगोळी साकारण्यात आली आहे. ही महारांगोळी काढण्यासाठी तब्बल 80 कलाशिक्षक 100 तास अहोरात्र झटले असून एकाच वेळी 9 वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये या रांगोळीची नोंद केली जाणार आहे. तसेच वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्येही या महारांगोळीची नोंद होणार आहे.

सांगलीच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची विश्‍वविक्रमी रांगोळी काढण्यात आली आहे. ही रांगोळी 250 बाय 550 फूट म्हणजे तब्बल सव्वा लाख स्क्वेअर फुटात साकारण्यात आली आहे. 15 फेब्रुवारीपासून रांगोळी काढण्यास सुरुवात झाली आहे. सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध रांगोळीकर आदमअली मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली 80 कलाशिक्षकानी मिळून ही शिवराज्याभिषेक रांगोळी साकारली आहे. 30 टन रांगोळी आणि 5 टन विविध रंगांचा वापर करून रांगोळी पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे लोकवर्गणीतून हा उपक्रम राबवला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व दाखवणारा शिवराज्याभिषेक सोहळा जगासमोर एका वेगळ्या पद्धतीने आणण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. 19 फेब्रुवारीला महाविश्वक्रमी रांगोळी सर्वांसाठी खुली करण्यात येणार असून 25 फेब्रुवारीपर्यंत प्रेक्षकांना पाहण्यासाठी खुली राहणार आहे.

या विश्वविक्रमासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, आशिया बुक, इंडिया बुक, गुगल बुक, ग्लोबल बुक, वर्ल्ड बुक, गोल्डन बुक,युनिक बुक अशा नऊ ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. एकाचवेळी या सर्व बुकात ही नोंद होणार आहे.

संपूर्ण विश्वात शिवराज्याभिषेक रांगोळीच्या माध्यमातून सांगली आणि महाराष्ट्राचे नाव कायमस्वरूपी कोरणाऱ्या सांगलीतील रांगोळी कलकार मात्र आर्थिक संकटात सापडले आहेत. एकूण 30 लाख रुपये खर्चाचा हा उपक्रम असताना या रागोंळीकारांकडे केवळ 7 लाख रुपये जमा झाले आहेत. तरीही जिद्दीने आणि रसिकांना दिलेल्या शब्दाखातर त्यांनी ही रांगोळी पूर्णत्वास आणली आहे.  शिवराज्याभिषेक विश्वविक्रमी रांगोळी उत्सव समिती स्थापन करून त्याची रितसर नोंदणी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे केली आहे. बँकेत खातंही उघडण्यात आलं आहे. राज्यभरातील लोकांकडून यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. उपक्रमाशिवाय जो खर्च येणार आहे, तो सर्व खर्च कलाशिक्षक स्वत: करणार आहेत.  रात्रं-दिवस राबून रांगोळी साकारणाऱ्यांना आता आर्थिक चिंता सतावत आहे. त्यामुळे त्यांनी शिवप्रेमींना आणि दानशुरांना मदतीचे आवाहन केलं आहे.

Non Stop LIVE Update
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.