रोईंगपटू दत्तू भोकनळवर फसवणुकीचा गुन्हा

नाशिक : भारताचा पदकविजेता रोईंगपटू दत्तू भोकनळवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. लग्नाचं आश्वासन देऊनही दत्तूने फसवलं असा आरोप एका तरुणीने केला आहे. तिच्या तक्रारीनंतर नाशिकमधील आडगाव पोलिस ठाण्यात फसवणूक तसेच शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार तरुणीच्या दाव्यानुसार, दत्तू आणि तिने एकांतात लग्न केलं होतं. मात्र, नंतर नातेवाईकांसमोर आपण लग्न …

रोईंगपटू दत्तू भोकनळवर फसवणुकीचा गुन्हा

नाशिक : भारताचा पदकविजेता रोईंगपटू दत्तू भोकनळवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. लग्नाचं आश्वासन देऊनही दत्तूने फसवलं असा आरोप एका तरुणीने केला आहे. तिच्या तक्रारीनंतर नाशिकमधील आडगाव पोलिस ठाण्यात फसवणूक तसेच शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार तरुणीच्या दाव्यानुसार, दत्तू आणि तिने एकांतात लग्न केलं होतं. मात्र, नंतर नातेवाईकांसमोर आपण लग्न करू असे ठरले असतानाही दत्तूने नकार दिला”, असा तक्रारदार महिलेचा दावा आहे.

दत्तू भोकनळ हा नाशिकच्या चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही या छोट्याशा गावचा आहे. त्याने नौकानयन या क्रीडाप्रकारात भारताचं नाव उज्वल केलं आहे. दत्तूने 2014 मध्ये त्याने राष्ट्रीय नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावली. मग 2015 मध्ये चीन येथे झालेल्या आशियाई नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेत दत्तूने सिंगल स्कल प्रकारात रौप्यपदकावर नाव कोरले.

आशियाई स्पर्धेत चमकदार कामगिरी

महाराष्ट्राचा रोलिंगपटू दत्तू भोकनळने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. अंगात 104 इतका ताप असतानाही दत्तूने आशियाई गेम्समध्ये  भारतीय टीमला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. सरकारने या खेळाला अजून प्रोत्साहन दिले पाहिजे ज्यामुळे देशाला मेडल मिळू शकतील, असं मत दत्तू भोकनळने त्यावेळी व्यक्त केले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *