केंद्र सरकार कोणासाठी काम करते?, कांदा प्रश्नावरुन छगन भुजबळ यांचा सवाल

केंद्र सरकारकडून निर्यातबंदी, व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाचे छापे आणि आता कांदा साठवणुकीवर मर्यादा आणल्याने कांदा कोणीही खरेदी करणार नाही. यामुळं केंद्र सरकार कोणासाठी काम करते समजत नसल्याचे भुजबळ म्हणाले. ( Chhagan Bhujbal asked question that for whom central govt work on issue of onion)

केंद्र सरकार कोणासाठी काम करते?, कांदा प्रश्नावरुन छगन भुजबळ यांचा सवाल
Follow us
| Updated on: Oct 24, 2020 | 7:21 PM

नाशिक : परतीच्या पावसामुळे शेती आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे असताना व्यापार्‍यांकडील कांदा साठवणुकीवर मर्यादा घातल्याने बाजार भावात घसरण होत आहे. परिणामी शेतकऱ्यांना याचा फटका बसत असल्याने केंद्र सरकार कोणासाठी काम करते? असा प्रश्न अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. निफाड तालुक्यातील बोकडदरे येथे भुजबळ यांनी शेतीची पाहणी केली. ( Chhagan Bhujbal asked question that for whom central govt work on issue of onion)

यंदा पावसामुळे चाळीत साठवलेल्या कांद्याचे व शेतातील कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा होत नसल्याने कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली. मात्र, कांदा अत्यावश्यक सेवेतून काढल्याने त्यावर निर्बंध नको पाहिजे होते. केंद्र सरकारकडून निर्यातबंदी, व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाचे छापे आणि आता कांदा साठवणुकीवर मर्यादा आणल्याने कांदा कोणीही खरेदी करणार नाही. यामुळं केंद्र सरकार कोणासाठी काम करते समजत नसल्याचे भुजबळ म्हणाले.

परदेशी कांद्याला कुठली अट नाही, परदेशी कांदा मोठ्या प्रमाणात आला तर काय करायचे, असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला. राज्य सरकारने नुकसानाचे पंचनामे केले आहेत. कांदा व्यापाराच्या बाबत केंद्र सरकार जो काही निर्णय घेईल त्याबाबत त्यांचाशी बोलण्याची गरज भुजबळ यांनी व्यक्त केली.

दरम्यान, केंद्र शासनाने कांदा साठवणुकीवर निर्बंध आणल्यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. यामुळे 1400 रुपयांची कांदा बाजार भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यावर आक्रमक होत कांदा उत्पादकांनी लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडले आहेत.

राज्य शासनाकडून 10 हजार कोटींचे पॅकेज

एकनाथ खडसे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शरद पवार योग्य वेळी त्यांना न्याय देतील, असं सूचक वक्तव्य भुजबळांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. विरोधकांकडून त्यावर टीका होत आहे. सरकारने 50 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केली असती तरी त्यावर विरोधकांनी टीका केली असती. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवयाची आहे, असं भुजबळ म्हणाले. केंद्र सरकारकडून राज्य सरकारचे येणे असलेली रक्कम मिळाली तर शेतकऱ्यांना अजून मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विनायकदादा पाटील यांना आदरांजली

ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, लेखक, साहित्यिक विनायकदादा पाटील यांचे निधन झाले. अत्यंत दुःख झाले. वनशेती हा त्यांचा आवडीचा आणि अभ्यासाचा विषय होता. भारतातील सहकारी वनशेतीचे ते जनक ठरले. त्यांच्या निधनाने एक मार्गदर्शक नेता काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना भुजबळ यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध घातल्यामुळे व्यापारी आक्रमक, लिलाव थांबवला

आता कुठं बॉक्स उघडलाय, खडसे आलेत, भाजपचे अनेक आमदार संपर्कात : छगन भुजबळ

( Chhagan Bhujbal asked question that for whom central govt work on issue of onion)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.