छगन भुजबळ गोपीनाथ गडावर, पंकजा मुंडे म्हणतात...

बीड : महाराष्ट्राच्या राजकारणाचं अत्यंत महत्त्वाचं केंद्र असलेल्या बीड जिल्ह्यातील परळीत महाआघाडीची दुसरी सभा होत आहे. या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, अजित पवार यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेपूर्वी छगन भुजबळ यांनी गोपीनाथ गडावर जाऊन भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. छगन भुजबळ …

छगन भुजबळ गोपीनाथ गडावर, पंकजा मुंडे म्हणतात...

बीड : महाराष्ट्राच्या राजकारणाचं अत्यंत महत्त्वाचं केंद्र असलेल्या बीड जिल्ह्यातील परळीत महाआघाडीची दुसरी सभा होत आहे. या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, अजित पवार यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेपूर्वी छगन भुजबळ यांनी गोपीनाथ गडावर जाऊन भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं.

छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे हे राजकारणातील विरोधक असले तरी त्यांचे कौटुंबीक संबंध अत्यंत चांगले होते. हे कौटुंबीक संबंध गोपीनाथ मुंडे यांच्यानंतरही ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी तसेच जोपासले आहेत. छगन भुजबळ तुरुंगात आणि रुग्णालयात असताना पंकजांनी त्यांची अनेकदा भेट घेऊन विचारपूसही केली होती.

छगन भुजबळ गोपीनाथ गडावर गेले असता त्यांच्या स्वागतासाठी पंकजा मुंडे उपस्थित नव्हत्या. पण ‘एक नाते राजकारणापलिकडचे’ असे म्हणत पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. गोपीनाथ गडावर छगन भुजबळांचे मुंडे कुटुंबीयांकडून यथोचित स्वागत करण्यात आल्याचंही पंकजांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं.

औरंगाबादमध्ये भाजपच्या विभागीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामुळे पंकजा मुंडे परळीत उपस्थित राहू शकल्या नाही. तर महाआघाडीच्य सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते परळीत दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर परळीतलं राजकारण पुन्हा एकदा राज्यात गाजणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *