सिनेमातील नट-पुढाऱ्यांना रायगडावर महाराजांचे जवळून दर्शन, शिवभक्तांना का नाही? : छत्रपती संभाजीराजे

शेकडो किलोमीटर दूरवरुन शिवभक्त गडावर दररोज येत असतात. महाराजांच्या चरणकमलावर माथा टेकून युगपुरुषास अभिवादन करावे, जवळून दर्शन घ्यावे, ही त्यांची माफक अपेक्षा असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

सिनेमातील नट-पुढाऱ्यांना रायगडावर महाराजांचे जवळून दर्शन, शिवभक्तांना का नाही? : छत्रपती संभाजीराजे
Follow us
| Updated on: Jul 21, 2020 | 4:58 PM

मुंबई : “सिनेमातले नट, पुढारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनापर्यंत जाऊ शकतात, तर शिवभक्तांनाही तिथपर्यंत जाता आलं पाहिजे” अशी मागणी राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. रायगडावरील राजसदरेवर जाऊन महाराजांचे दर्शन घेता यावे, यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला पत्र देण्याचे निर्देश त्यांनी दिले. (Chhatrapati Sambhajiraje on allowing Chhatrapati Shivaji Maharaj followers to visit Rajasadar at Raigad)

“सिनेमातले नट, पुढारी लोक महाराजांच्या सिंहासनापर्यंत जाऊ शकतात, तर मग शिवभक्तांना सुद्धा तिथपर्यंत जाता आलं पाहिजे. खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य अशी नेते मंडळी किंवा काही प्रशासकीय अधिकारी सहजपणे चौथऱ्यापर्यंत जातात. त्याचवेळी शिवभक्तसुद्धा शेकडो किलोमीटरचा प्रवास करुन येतो. त्यांनासुद्धा जवळून दर्शन घेता आलं पाहिजे. त्यामुळे प्राधिकरणाच्या वतीने ASI (Archaeological Survey of India म्हणजेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला) ताबडतोब पत्र देण्याचे निर्देश दिले.” असे छत्रपती संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.

हेही वाचा : मराठा समाजात एकी हवी, विजय आपलाच : छत्रपती संभाजीराजे

“दुर्गराज रायगडावरील महत्वाचे व पवित्र ठिकाण म्हणजे राजसदर. समतेचं, ममतेचं आणि अन्यायाविरुद्ध न्याय मागण्याचं हे ठिकाण म्हणजे भारतवर्षाचे अक्षय उर्जास्थान. याच सिंहसनावरुन महाराजांनी देशाला दिशा दिली. अशा पवित्र ठिकाणाचे धुलीकण आपल्या मस्तकी लावण्यासाठी शेकडो किलोमीटर दूरवरुन शिवभक्त गडावर दररोज येत असतात. त्या सर्वांची फार माफक अपेक्षा असते, महाराजांच्या चरणकमलावर माथा टेकून युगपुरुषास अभिवादन करावे, जवळून दर्शन घ्यावे.” असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“मागच्या काही वर्षांपासून राजसदरेवर शिवभक्तांना जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे अनेक शिवभक्त नाराज होताना दिसतात. राजसदरेवरील कोणत्याही भागाला शिवभक्त नुकसान पोहोचवणार नाहीत. त्यांच्यासाठी महाराज हे सर्वस्व आहेत. त्यामुळे महाराजांच्या मूर्तीला तसेच, सिंहासन चौथऱ्याला प्राणपणाने जपतील हा विश्वास मला आहे. तरीही जी काही सुरक्षा व्यवस्था करायची असेल ती पुतळ्याशेजारी असेल. शिवभक्तांना लांबून पाठवणे योग्य नाही.” अशी इच्छा संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे.

(Chhatrapati Sambhajiraje on allowing Chhatrapati Shivaji Maharaj followers to visit Rajasadar at Raigad)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.