छत्रपती शिवरायांच्या 390 व्या जयंतीचा उत्साह, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवनेरीवर सोहळा

सोलापुरात वीरपत्नीसह हजारो शिवमाता आणि शिवकन्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti, छत्रपती शिवरायांच्या 390 व्या जयंतीचा उत्साह, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवनेरीवर सोहळा

मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची 390 वी जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी होणार (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) आहे. शिवरायांची जन्मभूमी शिवनेरी गडासह राज्यभरात ठिकठिकाणी शिवजन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे.

किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवजयंतीचा उत्सव साजरा होणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील काही मंत्री या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

आदिवासी भागातील तेजुरच्या ठाकरवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी अनोख्या पद्धतीने मंत्रीमहोदयांचं स्वागत करणार आहेत. यावेळी 101 विद्यार्थी आदिवासी डांगी नृत्यातून भगव्या झेंड्यांचं संचलन करणार आहेत.

सोलापुरात वीरपत्नीसह हजारो शिवमाता आणि शिवकन्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी चौकातील महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महिलांनी बाल शिवबांसाठी पाळणाही हलवला. (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti)

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti, छत्रपती शिवरायांच्या 390 व्या जयंतीचा उत्साह, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवनेरीवर सोहळा
सोलापुरात बालशिवबाचा पाळणा

शिवजयंतीचा सोहळ्यानिमित्ताने पंढरपूर शहर आणि परिसरातील शिवप्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे. भगव्या झेंड्यांनी बाजारपेठा सजल्या असून अनेक ठिकाणी जयंतीच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti, छत्रपती शिवरायांच्या 390 व्या जयंतीचा उत्साह, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवनेरीवर सोहळा

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी शहरात शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांची 9 हजार रोपांच्या सहाय्याने भव्य प्रतिमा साकारण्यात आली. या भव्य शिवप्रतिमेतून वृक्षसंवर्धन आणि जलसंधारणाचा संदेश देण्यात आला.

शिवजयंतीच्या निमित्ताने परभणी शहरात भव्य मशाल रॅली काढण्यात आली. या मशाल रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. नांदेड शहरातही शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला महिलांच्या भव्य मशाल रॅलाचे आयोजन करण्यात आलं होतं. (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti)

संबंधित बातम्या :

2400 चौ.फू. बंगल्याला किल्ल्याचा आकार, जळगावात शिवप्रेमीने रायगड साकारला

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *