जयदीप आपटेसाठी पोलिसांनी अशी लावली होती फिल्डिंग, जाळ्यात असा अडकला

मालवणमधील महाराजांचा पुतळा कोसळल्यापासून शिल्पकार जयदीप आपटेचा शोध सुरु होता. अखेर काल रात्री घरी येत असतानाच आपटे पोलिसांच्या हाती लागला. 10 दिवस फरार असलेल्या आपटेला अटक कशी झाली, पाहुयात

जयदीप आपटेसाठी पोलिसांनी अशी लावली होती फिल्डिंग, जाळ्यात असा अडकला
Follow us
| Updated on: Sep 05, 2024 | 8:52 PM

अखेर 10 दिवसांनंतर, शिल्पकार जयदीप आपटे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. मालवणमध्ये अवघ्या 9 महिन्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर, आपटे फरार होता. मात्र, बुधवारी रात्री साडे 10 वाजता जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केली. आपटे आणि बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कुटुंबाला भेटण्यासाठी आला असताना, आपटे अलगद पोलिसांच्या हाती लागला. जयदीप आपटे कल्याणमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यासाठी एक पथक कल्याणच्या रेल्वे स्टेशनवर आणि दुसरं पथक कल्याणच्या राहत्या घराबाहेर होतं.

असा अडकला जाळ्यात

जयदीप आपटे कसाऱ्यावरुन लोकल ट्रेन पकडून कल्याणला आला. कल्याणच्या रेल्वे स्टेशनवर उतरुन जयदीप ऑटो रिक्षानं दूध नाका परिसरात आला. कोणी ओळखू नये म्हणून आपटेनं तोंडाला मास्क, डोक्यावर टोपी आणि रुमालही गुंडाळला होता. 2 बॅगा घेवून जयदीप आपटे इमारतीच्या गेटवर आला, पोलीस इमारतीच्या परिसरात होतेच. पोलिसांनी जयदीपकडे आयकार्डची मागणी करत मास्क काढायला लावला. मास्क काढताच पोलिसांना जयदीपच असल्याची खात्री झाली आणि जयदीपला पोलिसांनी अटक केली.

घाबरलेल्या अवस्थेत जयदीप ढसाढसा रडायला लागला आणि घरी भेटायला जावू देण्याची विनंती करु लागला, पण पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणलं.  शिवप्रेमींच्या दबावामुळं आपटेला त्याचे बॉस वाचवू शकले नाहीत, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

आपटेला पोलीस कोठडी

आपटे सध्या सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात आहे. 5 दिवसांची कोठडी सिंधुदुर्ग पोलिसांना मिळाली आहे. मात्र राऊतांनी आणखी एक गंभीर आरोप करत सनसनाटी निर्माण केली. आपटेच्या अटकेआधीच जामिनासाठी ठाण्यातून सूत्र हलवण्यात आलेली आहेत, असं राऊत म्हणाले आहेत.

आपटेच्या अटकेनंतरही राजकीय आरोप प्रत्यारोप सुरुच आहे. मात्र, 8 महिने 22 दिवसांत महाराजांचा पुतळा कसा कोसळला. कंत्राट कशाप्रकारे मिळवलं. 6 महिन्यात पुतळा तयार करण्यासाठी कोणाचा दबाव होता का ?, पुतळ्यात भ्रष्टाचार झाला का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्याचं काम पोलीस जयदीप आपटेकडून करतील.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.