छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मोठी अपडेट, जयदीप आपटेला 6 दिवसांची पोलीस कोठडी

मुख्य आरोपी असलेला शिल्पकार जयदीप आपटेला येत्या १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मोठी अपडेट, जयदीप आपटेला 6 दिवसांची पोलीस कोठडी
Follow us
| Updated on: Sep 05, 2024 | 3:53 PM

सिंधुदुर्गातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर ८ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या दुर्घटनेनंतर शिवप्रेमींसह विरोधकही आक्रमक झाले होते. या घटनेनंतर या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा फरार झाला होता. यानंतर तब्बल 11 दिवसांनी फरार असलेल्या जयदीप आपटेला पकडण्यात पोलिसांना यश आले. यानंतर जयदीप आपटेला आज मालवण न्यायालयात हजर करण्यात आले. अखेर मालवण न्यायालयाने जयदीप आपटेला ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट रोजी कोसळला होता. त्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे हा फरार झाला होता. यानंतर पोलिसांनी जयदीप आपटेविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी केली होती. तसेच मालवण पोलीस, ठाणे पोलीस आणि कल्याण ग्रामीण पोलिसांची पाच पथकं त्याचा कसून शोध घेत होती. मात्र जयदीप आपटे हा त्यांच्या हाती लागत नव्हता. पण बुधवारी (४ सप्टेंबर) जयदीप आपटे हा अंधाराचा फायदा घेत पोलिसांची नजर चुकवत आपल्या पत्नी आणि आईला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

६ दिवसांची पोलीस कोठडी

यानंतर जयदीप आपटेला कल्याण पोलिसांनी मालवण पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर जयदीप आपटेला मालवणमध्ये आणण्यात आले. त्याला मालवण न्यायालयासमोर हजर करण्यात आले. आता दिवाणी न्यायाधीश महेश देवकते यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी वकील तुषार भनगे यांनी बाजू मांडली. तर आरोपीचे वकील गणेश सोहनी यांनीही त्यांची बाजू मांडली. या दोन्हीही बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी जयदीप आपटेला ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जयदीप आपटे हा १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे.

तर दुसरीकडे या प्रकरणातील दुसरा आरोपी बांधकाम सल्लागार चेतन पाटील याची पोलीस कोठडी आज संपणार होती. त्यालाही न्यायालयात हजर केले गेले. चेतन पाटील यालाही १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नेमकं काय घडलं?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा भव्य पुतळा राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. मात्र काल (26 ऑगस्ट) छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला. अवघ्या 8 महिने 22 दिवसांत शिवरायांचा हा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजीची वातावरण आहे.

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ...
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ....
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ.
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख.
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?.
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.