छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारवर टीका, कृषी कायद्यावर म्हणाले…

संगमनेरमध्ये आयोजित पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार स्वीकारल्यावर ते बोलत होते. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी केंद्र सरकारच्या कृषी धोरणावर टीका केली आहे.

छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारवर टीका, कृषी कायद्यावर म्हणाले...

शिर्डी : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये असलेली अनास्था दूर करण्याची गरज असून शिक्षक आणि पालकांनी यासाठी प्रयत्न केले तर जिल्हा परिषदेच्या शाळाही काही कमी नाही हे सिद्ध होवू शकतं असं मत ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांनी व्यक्त केलं आहे. संगमनेरमध्ये आयोजित पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार स्वीकारल्यावर ते बोलत होते. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी केंद्र सरकारच्या कृषी धोरणावर टीका केली आहे. (Chhattisgarh Chief Minister criticizes on Central Government on Agriculture Act )

संगमनेर तालुक्यातील अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेमार्फत दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरित क्रांतीचे प्रणेते अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंतीनिमित्त आज ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अण्णासाहेब स्मृती पुरस्कार तर संपादक संजय आवटे यांना भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यासह विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये असलेली अनास्था कमी करण्याची गरज आहे जर शिक्षक आणि पालकांनी ठरवलं तर ते शक्य असल्याच रणजितसिंह डिसले म्हणाले. आज देशात गाईच्या नावाने राजकरण सुरू असून फक्त भारत देशात गाय दुधाऐवजी मत देण्याचं काम करत असल्याचा टोला मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी भाषणातून लगावला. यांच्या शासन काळात गोशाळा निघाल्या कोटींचा निधी सुद्धा दिला गेला. मात्र, आमच्या राज्यात गाय हडकुळी होत गेली आणि गोशाळा चालक मात्र गब्बर झाले अशी टीका केली.

दरम्यान, दिल्ली सरकारने यश मिळवायचं असेल आणि शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर छत्तीसगड मॉडेलचा अवलंब करण्याचा सल्ला ही भाषणातून दिला आहे. अलीकडच्या काळात देशात सुरू असलेल्या अनेक प्रकरणाचा निकाल न्यायालय देताय. आज देशात 26 जानेवारी जवळ येतेय दिल्लीच्या जवळ गराडा घालून बसलेल्या शेतकऱ्यांना घालवले पाहिजे यासाठी दुसरा कोणताही मार्ग नव्हता. सुदैवानं न्यायालयाने निर्णय दिला आहे. मात्र, उत्तर भारतातील आमचे शेतकरी चार सदस्य असलेली समिती योग्य निर्णय देतील तोपर्यंत ते उठणार नाही अशी मला खात्री असल्याच मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील दिलं.

महाराष्ट्रातील आमच्या कार्यकर्त्यांसाठी मुख्यमंत्री बघेल हे प्रेरणा असून 15 वर्षांची भाजपची सत्ता उलथवन्यात ते यशस्वी झाले असं काम जर महाराष्ट्रात केलं तर इथे सुद्धा काँग्रेसचे वेगळं चित्र पाहायला मिळेल असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. तर जिल्हा परिषद शाळेचा दर्जा आता सुधारत असून भविष्यात इंग्रजी कडे वळलेल्या गाड्या पुन्हा गावाकडे येतील असंही मनोगत भाषणातून व्यक्त केलं. (Chhattisgarh Chief Minister criticizes on Central Government on Agriculture Act )

संबंधित बातम्या – 

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती

राज्य सरकारचा ओबीसींना दिलासा, आरक्षणाला चॅलेंज करणाऱ्या याचिकेसाठी वकिलाची नियुक्ती

(Chhattisgarh Chief Minister criticizes on Central Government on Agriculture Act )

Published On - 7:57 pm, Wed, 13 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI