शरद पवार पहिल्यांदा हाफ चड्डीमुळेच मुख्यमंत्री झाले : मुख्यमंत्री फडणवीस

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आता पवार-मोहिते संघर्षात उडी घेतली आहे. शरद पवार आपण पहिल्यांदा हाफ चड्डीमुळेच मुख्यमंत्री झाला होता, असे म्हणत फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले. ते आज कुर्डूवाडीतील भाजपच्या प्रचारसभेत बोलत होते. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीकडून भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर, तर आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे निवडणूक …

शरद पवार पहिल्यांदा हाफ चड्डीमुळेच मुख्यमंत्री झाले : मुख्यमंत्री फडणवीस

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आता पवार-मोहिते संघर्षात उडी घेतली आहे. शरद पवार आपण पहिल्यांदा हाफ चड्डीमुळेच मुख्यमंत्री झाला होता, असे म्हणत फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले. ते आज कुर्डूवाडीतील भाजपच्या प्रचारसभेत बोलत होते. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीकडून भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर, तर आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे निवडणूक मैदानात आहेत. येथे लोकसभा निडवणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 23 मे रोजी मतदान होईल.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘पवार आपण पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला, तेव्हा जनसंघाच्या मदतीने झालात. तेव्हा हाफ चड्डी आठवली नाही. आता आमची फुल पँट झाली आहे. आपण ज्या खालच्या पातळीवर जाऊ शकता, तेथे मला जाता येत नाही.’ मात्र, निकालानंतर कुणाची चड्डी राहते हे कळेल, असाही टोला फडणवीसांनी लगावला. तसेच राष्ट्रवादीचा जाहीरनामा म्हणजे कोंबड्या विकण्याचा धंदा असल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.

मुख्यमंत्री फडणवीसांनी आज संजय शिंदे यांच्या ‘होम ग्राऊंड’वर सभा घेत शरद पवारांना लक्ष्य केले. या सभेत त्यांनी शरद पवारांच्या विजयसिंह मोहिते पाटलांवरील टीकेला उत्तर दिले. तसेच आपल्यासारखे मला खालच्या पातळीवर जाता येत नाही, असेही सांगितले. शरद पवार यांना मोहिते यांच्या भाजपप्रवेशानंतर माळशिरस तालुक्यातील सभेत विजयसिंह मोहिते पाटील यांची खिल्ली उडवत टीका केली होती. पवारांनी मोहिते पाटलांची खिल्ली उडवत या वयात हाफ चड्डी घालून पाय-मांड्या दाखवू नका, अशी टीका केली होती.

तिसऱ्या टप्प्यासाठी 23 एप्रिलला मतदान होणार असून 23 मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या टप्प्यात 14 जागांवर मतदान होईल.

तिसऱ्या टप्प्यात ‘या’ ठिकाणी मतदान होणार

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *