राज्यात मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम राबवणार, मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान मान्यता

राज्यात मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. (Water Conservation program In Maharashtra)

राज्यात मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम राबवणार, मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान मान्यता
जलसंवर्धन कार्यक्रम (प्रातनिधिक)

मुंबई : राज्यात मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. याद्धारे जलस्त्रोतांची दुरुस्ती करून सिंचन क्षमता पुनर्स्थापित करण्यात येईल. यासाठी 1340.75 कोटी रुपये निधी लागेल. हा कार्यक्रम एप्रिल 2020 ते मार्च 2023 या कालावधीत राबविण्यात येईल. (CM will implement Water Conservation program In Maharashtra)

सिंचनातून समृद्धी वाढवण्यासाठी सिंचन प्रकल्प कार्यक्षम पद्धतीने कार्यरत राहणे आवश्यक आहे. जलसंधारण यंत्रणेमार्फत विकेंद्रीत आणि राज्याच्या सर्वदूर भागात पाणीसाठे निर्माण केलेले आहेत. या योजनांचा फार मोठा लाभ शेतीला संरक्षित सिंचन उपलब्ध करून देण्यात झाला. तसाच पाणीपुरवठा योजनांसाठी ही झालेला आहे.

गेल्या 30 ते 40 वर्षात दुष्काळ निवारणार्थ रोजगार हमी योजना आणि इतर योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जलस्त्रोतांची निर्मिती करण्यात आली. पण या जलस्त्रोतांची नियमित देखभाल आणि दुरुस्ती न झाल्यामुळे त्याचा पूर्ण कार्यक्षमतेने वापर करण्यात येत नाही. अशा पूर्ण झालेल्या योजनांपैकी 7916 योजनांची विशेष दुरुस्ती करून जलसाठा आणि सिंचन क्षमता पुनर्स्थापित करणे आवश्यक आहे. या योजनांचे पुनरुज्जीवन केल्यास पूर्ण क्षमतेने पाणीसाठा उपलब्ध होईल.

बंधारे, तलाव दुरुस्त करणार

मृद आणि जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या 0 ते 600 हेक्टर सिंचन क्षमतेच्या मर्यादेतील पाझर तलाव, गाव तलाव, साठवण तलाव, सिंचन तलाव, लघू पाटबंधारे तलाव, साठवण बंधारे, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, माजी मालगुजारी तलाव, सिमेंट नाला बांध, माती नालाबांध, वळवणीचे बंधारे इत्यादी जलस्त्रोतांची विशेष दुरुस्ती करण्यात येणार आहे. याची सिंचन क्षमता पुनर्स्थापित करण्याकरिता हा कार्यक्रम मृद आणि जलसंधारण विभागामार्फत हाती घेतला जाईल.

कालव्याच्या भरावाची आणि कालव्यावरील बांधकामाची तुटफूट झालेली असल्याने सिंचनासाठी कालव्यातून जाणारे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जाते. त्यामुळे या कालव्यांच्या दुरुस्तीची कामे घेण्यात येतील.

मृद आणि जलसंधारण विभागाच्या दक्षता आणि गुणनियंत्रण पथकामार्फत प्रगतीपथावरील, पूर्ण झालेल्या दुरुस्ती कामांची वेळोवेळी तपासणी करण्यात येईल. राज्य स्तरावर आणि आयुक्त स्तरावर प्रकल्प कार्यान्वयन कक्षाची स्थापना करून प्रकल्पाचे संनियंत्रण केले जाईल. मुख्य अभियंता तसेच सह सचिव हे प्रकल्प कर्यान्वयन कक्षाचे प्रमुख राहतील. (CM will implement Water Conservation program In Maharashtra)

संबंधित बातम्या : 

उपमुख्यमंत्रीपदाची मागणी कुठून आली माहित नाही, पण एकत्र बसून चर्चा करु-काँग्रेस मंत्री

मुंबईतील राजकारण तापणार; ‘त्या’ मुद्द्यावरुन शिवसेना-काँग्रेस आमनेसामने

Published On - 7:41 pm, Thu, 4 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI