चिपळूणमध्ये रुग्णालयांपाठोपाठ स्मशानभूमीही हाऊसफुल्ल, मृतदेह वेटिंगवर

चिपळूणमधील स्मशानभूमी ही आता हाऊसफुल्ल झाली आहे.

चिपळूणमध्ये रुग्णालयांपाठोपाठ स्मशानभूमीही हाऊसफुल्ल, मृतदेह वेटिंगवर

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यात आता रुग्णालयापाठोपाठ आता स्मशानभूमीही हाऊसफुल्ल झाली आहे (Chiplun Graveyard Is Houseful). अग्नी देण्यासाठी मृतदेह वेटिंगवर ठेवण्यात येत आहेत. चिपळूणमध्ये कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे कोरोना केअर सेंटर म्हणून जाहीर झालेले रुग्णालय फुल्ल झाले आहेत. कोणाला बेड मिळत नाही, तर कोणाला व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीत, त्याचबरोबर एक गंभीर बाब आता समोर आली आहे (Chiplun Graveyard Is Houseful).

चिपळूणमधील स्मशानभूमी ही आता हाऊसफुल्ल झाली आहे. काल रात्री चिपळूण शहरातील रामतीर्थ स्मशानभूमीमध्ये एकाच वेळेला सहा मृतदेहांना अग्नी देण्यात आली. मात्र, या वेळेला आलेल्या नवीन मृतदेहांना वेटिंगवर ठेवावं लागलं.

या महिन्याभरात 44 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. कोरोना संशयित मृतदेहांवर नातेवाईक अंत्यसंस्कार करत नसून नगरपालिकेचे कर्मचारी अग्नी देतात. तर काही वेळेला असे मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळलेलेही नसतात. त्यामुळे सहाजिकच नातेवाईक हात लावण्यास पुढे येत नाहीत.

एकीकडे, हॉस्पिटलमध्ये बेड, व्हेंटिलेटरची कमतरता आणि दुसरीकडे स्मशानभूमीमध्ये सरण, लाकडं आणि डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. चिपळूण शहरांमध्ये मृत्यूचा दर वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

Chiplun Graveyard Is Houseful

संबंधित बातम्या :

राज्यातील सर्व पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये, मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कडक कारवाई

नागपुरात दीड महिन्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्णांचा ग्राफ घसरला

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *