‘फाईट’वरुन वातावरण टाईट, उदयनराजे समर्थकांकडून साताऱ्यात तोडफोड

  • Updated On - 4:54 pm, Fri, 5 July 19 Edited By:
'फाईट'वरुन वातावरण टाईट, उदयनराजे समर्थकांकडून साताऱ्यात तोडफोड

सातारा : ‘साताऱ्यात फक्त मीच चालणार’ असा एक डायलॉग ‘फाईट’ या 20 डिसेंबरला रिलीज होणाऱ्या सिनेमात आहे. या डायलॉगवर आक्षेप घेत साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडून तोडफोड करण्यात आली. समर्थकांनी दिग्दर्शकाची गाडीही फोडली आणि सिनेमाचे पोस्टर फाडले.

सिनेमाच्या प्रमोशनसाठी निर्मात्यांकडून साताऱ्यातील राधिका पॅलेस हॉटेलला पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. इतर कलाकारांसह सिनेमाचे दिग्दर्शक जिमी मोरे यांचीही उपस्थिती होती. पण उदयनराजे समर्थकांचा ‘साताऱ्यात फक्त मीच चालणार’ या वाक्यावर आक्षेप आहे. त्यामुळे दिग्दर्शकाच्या गाडीची तोडफोड करण्यात आली.

‘साताऱ्यात फक्त उदयनराजेच चालतात’ असं सांगत या समर्थकांकडून तोडफोड करण्यात आली. हा डायलॉग सिनेमातून वगळण्यात यावा म्हणून ही तोडफोड केल्याचंही उदयनराजे समर्थकांनी सांगितलं. त्यामुळे आता निर्माते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलं आहे.