शाळकरी मुलांचं भांडण, दहावीतील विद्यार्थ्याच्या पाठीत चाकू खुपसला

औरंगाबाद: किरकोळ वादातून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने त्याचाच वर्गातील विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला केला. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. याप्रकरणी जवाहर नगर पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्योतीनगर परिसरातील चाटे कोचिंग क्लासमध्ये दहावीतल्या एका विद्यार्थ्याने आपल्या वर्गात शिकणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला केला. ट्यूशन संपल्यावर पीडित मुलगा गणेश काळे हा पाणी पिण्यासाठी गेला असताना, आरोपीने …

शाळकरी मुलांचं भांडण, दहावीतील विद्यार्थ्याच्या पाठीत चाकू खुपसला

औरंगाबाद: किरकोळ वादातून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने त्याचाच वर्गातील विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला केला. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. याप्रकरणी जवाहर नगर पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ज्योतीनगर परिसरातील चाटे कोचिंग क्लासमध्ये दहावीतल्या एका विद्यार्थ्याने आपल्या वर्गात शिकणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला केला. ट्यूशन संपल्यावर पीडित मुलगा गणेश काळे हा पाणी पिण्यासाठी गेला असताना, आरोपीने त्याच्या पाठीवर चाकूने वार केले. गणेशवर 3 वार करण्यात आले, यात तो जखमी झाला आहे. खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

गणेश आणि आरोपी विद्यार्थ्यांत दोन दिवसांपूर्वी किरकोळ भांडण झालं होतं. त्यानंतर याच भांडणातून त्या विद्यार्थ्याने गणेशवर हल्ला केला. दोन्ही मुलं अल्पवयीन आहेत. याआधीही या 2 मुलांची काहीतरी कारणावरुन भांडणं झाली असल्याचे शिक्षक आणि पालक सांगतात.

विद्यार्थ्यांची भांडणं अशा पद्धतीने टोकाला जात आहेत. लहान वयात मुलं रागाच्या भरात असं पाऊल उचलत असल्याच्या घटनांमध्ये दिवसंदिवस वाढ होत आहे. औरंगाबादच्या या घटनेने मात्र सगळेच हादरले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *