शिवसेनेच्या वर्धापन दिनाला मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेचे वर्धापन दिनाचे निमंत्रण स्विकारले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उद्याच्या (19 जून) 53 व्या वर्धापन दिनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.

शिवसेनेच्या वर्धापन दिनाला मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेचे वर्धापन दिनाचे निमंत्रण स्वीकारले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उद्याच्या (19 जून) 53 व्या वर्धापन दिनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. वर्धापन दिनाच्या भाषणात उद्धव ठाकरे पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा आहे. या निर्णयामुळे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच अन्य पक्षातील मुख्यमंत्री हजर राहणार आहेत. एखाद्या राजकीय पक्षाच्या वर्धापन दिनी दुसऱ्या पक्षाचा महत्त्वाचा नेता हजर राहण्याची ही बहुदा पहिलीच घटना आहे.

ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी करावयाचा पाठपुरावा, शेतकरी आणि शेतमजुरांसाठी असलेल्या सरकारी योजनांची कार्यवाही, यासंदर्भात शिवसेनेचे मंत्री, नेते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांना वर्धापन दिनाच्या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

माटुंगा येथील षण्मुखांनाद सभागृहात सायंकाळी 5 वाजता शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. वर्धापन दिनाच्या भाषणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

शिवसेनेच्या व्यासपीठावर यापूर्वी कोण कोण?

यापूर्वी शिवसेना स्थापनेनंतर 70 च्या दशकात शरद पवार आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबत शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला उपस्थिती लावली होती. तसेच दिवंगत ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे यांनीही शिवसेनेच्या व्यासपीठावर जात शिवसैनिकांना मार्गदर्शन केले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *