देश चालवण्यास 56 पक्ष नव्हे, 56 इंच छाती लागते : मुख्यमंत्री

वर्धा: देश चालवण्यासाठी 56 इंचाची छाती लागते, 56 पक्षांचं गठबंधन नाही, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते वर्ध्यात बोलत होते. महायुतीची पहिली जाहीर सभा आज वर्ध्यात आयोजित करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सभेला संबोधित केलं. त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसह महाआघाडीवर हल्ला चढवला. मुख्यमंत्री म्हणाले, “1 एप्रिलला एप्रिल फूल बनवलं …

देश चालवण्यास 56 पक्ष नव्हे, 56 इंच छाती लागते : मुख्यमंत्री

वर्धा: देश चालवण्यासाठी 56 इंचाची छाती लागते, 56 पक्षांचं गठबंधन नाही, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते वर्ध्यात बोलत होते. महायुतीची पहिली जाहीर सभा आज वर्ध्यात आयोजित करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सभेला संबोधित केलं.

त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसह महाआघाडीवर हल्ला चढवला. मुख्यमंत्री म्हणाले, “1 एप्रिलला एप्रिल फूल बनवलं जातं. पण भारतात एका पक्षानं 50 वर्षे एप्रिल फूल बनवलं आहे. पण आता तसं होणार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचा सूफडासाफ होईल”

2014 मध्येही पहिली सभा वर्ध्यात घेतली होती. गांधीजींच स्वप्न पूर्ण झालं आणि काँग्रेस विसर्जित झाली, असा टोमणा मुख्यमंत्र्यांनी मारला.

यावेळीही विदर्भातून 10 पैकी 10 जागा मिळवून देणार, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित मान्यवरापैंकी प्रत्येकाचं स्वागत करताना प्रत्येकाच्या नावापुढे चौकीदार असा उल्लेख केला.

मुख्यंत्र्यांकडून चौकीदार शब्दावर जास्त भर देण्यात आला. मोदींचे आभार मानतो, कारण त्यांनी विदर्भातील मला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली, असं फडणवीस म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *