''विधानसभेला तुमचे कपडे उतरले, मुंबई लंगोट शिल्लक होती तीही उद्धवजींनी उतरवली''

कोल्हापूर : महायुतीची राज्यातील पहिली सभा कोल्हापुरात झाली आणि या सभेतूनच प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी ही सभा झाली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेता ‘बारामतीचा पोपट’ असा उल्लेख करुन घणाघाती टीका केली. तुमचे कपडे उतरले असून लंगोटही उतरली आहे, …

''विधानसभेला तुमचे कपडे उतरले, मुंबई लंगोट शिल्लक होती तीही उद्धवजींनी उतरवली''

कोल्हापूर : महायुतीची राज्यातील पहिली सभा कोल्हापुरात झाली आणि या सभेतूनच प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी ही सभा झाली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेता ‘बारामतीचा पोपट’ असा उल्लेख करुन घणाघाती टीका केली. तुमचे कपडे उतरले असून लंगोटही उतरली आहे, असा टोला त्यांनी लगावला.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

“महाराष्ट्रात बोलघेवडे लोक खुप आहेत. काही जण स्वतः बोलू शकत नाहीत म्हणून पोपट नेमू लागले आहेत. अलीकडच्या काळात बारामतीचा पोपट देखील बोलायला लागलाय. बारामतीच्या पोपटाला एकच सांगायचंय, एक लक्षात ठेवा, आमचे कपडे कुणीही उतरवू शकत नाही. विधानसभेच्या निवडणुकीत पहिले तुमचे कपडे उतरले, महापालिकेच्या निवडणुकीतही कपडे उतरले, मुंबईत लंगोट शिल्लक होती, उद्धवजींनी ती लंगोटही उतरवली, आता तुमचं काहीही शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळे कुणाची तरी सुपारी घेऊन बोलण्यापेक्षा नीट घरी बसा, शांत राहा आणि मोदी कसे पंतप्रधान बनतात ते पाहा. दुसरा सल्ला देतो, मोदी सूर्यासारखे आहेत, सूर्याकडे चेहरा करुन थुंकलं तर थुंकी आपल्याच तोंडावर पडते, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर सभा घेऊन मोदींविरोधात प्रचार करणार असल्याचं सांगितलं होतं. शिवाय त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली होती. मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते, त्यापैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्याचाच संदर्भ घेऊन मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला. विशेष म्हणजे यावेळी उद्धव ठाकरे बाजूलाच बसलेले होते.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा व्हिडीओ

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *