दिल्लीतलं सरकारही झुकलं, अण्णांच्या उपोषणाला यश

राळेगणसिद्धी (अहमदनगर): ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सातव्या दिवशी उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्यासोबतच्या चर्चेनंतर त्यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. शेतकरी प्रश्न आणि लोकपालसंबंधी सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. विविध मागण्यांसाठी तातडीने समिती नियुक्त केली जाणार […]

दिल्लीतलं सरकारही झुकलं, अण्णांच्या उपोषणाला यश
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

राळेगणसिद्धी (अहमदनगर): ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सातव्या दिवशी उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्यासोबतच्या चर्चेनंतर त्यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. शेतकरी प्रश्न आणि लोकपालसंबंधी सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. विविध मागण्यांसाठी तातडीने समिती नियुक्त केली जाणार आहे. साडे पाच तास मुख्यमंत्री आणि अण्णा यांच्यामध्ये चर्चा सुरु होती.

लोकपाल नियुक्ती, लोकायुक्त कायदा आणि शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव या मागण्यांसाठी अण्णा हजारेंनी 30 जानेवारीपासून त्यांच्या राळेगणसिद्धी या गावात उपोषणाला सुरुवात केली. उपोषणाच्या सातव्या दिवशी गावकऱ्यांनी आज चूलबंद आंदोलन केलं. काही शेतकरी बैलगाडी आणि बैलांसह उपोषणात सहभागी झाले.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर उपोषणावर तोडगा काढूनच बैठक संपवली. यावर ते म्हणाले, आम्हाला सर्वांना अण्णांच्या तब्येतीची काळजी होती. शरीरावर परिणाम होत होता. त्यामुळे आम्ही उपोषण सुटेपर्यंत राळेगण सोडणार नाही, असा ठाम निश्चय करुनच आलो होतो. अण्णांनी स्वतःसाठी नाही, तर जनतेसाठी निर्णय घेतले आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

अण्णांना पंतप्रधान कार्यालयाने पत्र दिलंय. लोकपालबाबत 13 फेब्रुवारीला समिती निर्णय घेणार आहे. राज्यात लोकायुक्त कायदा जुना आहे. त्यामुळे नव्या कायद्याचा मसुदा तयार करण्यात येईल. मसुदा कसा हवा त्यासाठी अण्णा सांगतील त्याच तज्ञांची नियुक्ती केली जाईल. अण्णांच्या स्वप्नातील लोकायुक्त कायदा राज्यात आणू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

शेतकरी हा अण्णांचा आत्मा आहे. नाशवंत फळभाज्या, हमीभाव, कृषीमूल्य आयोगाची स्वायत्तता या सर्वांवर निर्णय घेण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कृषीमंत्री राधामोहन सिंह हे देखील राळेगणला आले होते. मात्र नंतर पुढील कार्यक्रमासाठी ते निघून गेले.

अहमदनगरला जिल्हाधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलचं कारण दाखवत निवेदन स्वीकारलं नाही. पण हा प्रोटोकॉल आता बदलत आहे. जनताच मालक आहे आणि जनतेला सामोरं जावं लागेल असा निर्णय घेत आहोत. देशाला अण्णांची गरज आहे. भावनात्मक आहात, पण प्राणत्याग नको. आमचं काही चुकलं तर कान धरुन सांगा, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

हनुमानाला जास्त त्रास झाला – गिरीश महाजन

अण्णांच्या सात दिवसांच्या उपोषणात सर्वात जास्त धावपळ केली ती म्हणजे गिरीश महाजन यांना. मुंबई ते राळेगण असा प्रवास त्यांनी या सात दिवसात अनेकदा केला. दिल्लीतल्या उपोषणाच्या वेळीही त्यांनी मध्यस्थी केली होती. पण दिल्लीतल्या उपोषणापेक्षाही यावेळी हनुमानाला जास्त त्रास झाला, असं गिरीश महाजन मिश्कील शैलीत म्हणाले.

संबंधित बातम्या 

वाचा: हे वाचाच, भारतीय म्हणून तुम्हालाही अण्णा हजारेंचा अभिमान वाटेल!  

अण्णांच्या सर्व मागण्या जवळपास मान्य, उपोषण मागे घ्या, मुख्यमंत्र्यांची विनंती  

तीन तासांच्या बैठकीनंतरही तोडगा नाहीच, अण्णा उपोषणावर ठाम   

अण्णा, या नालायकांसाठी जीवाची बाजी लावू नका : राज ठाकरे  

हे वाचाच, भारतीय म्हणून तुम्हालाही अण्णा हजारेंचा अभिमान वाटेल!  

LIVE : राज ठाकरे आणि अण्णांची बंद दाराआड चर्चा  

राळेगणसिद्धी : राज ठाकरे अण्णा हजारेंच्या भेटीला 

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.