भुजबळांच्या जिल्ह्यात मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंसह 5 मंत्री नाशिक दौऱ्यावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आज 5 महत्वाचे मंत्री नाशिक दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray Nashik tour)आज नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्र आढवा बैठक घेणार आहेत.

CM Uddhav Thackeray Nashik tour, भुजबळांच्या जिल्ह्यात मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंसह 5 मंत्री नाशिक दौऱ्यावर

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आज 5 महत्वाचे मंत्री नाशिक दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray Nashik tour)आज नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्र आढवा बैठक घेणार आहेत. जळगाव, नंदुरबार, धुळे, अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांचा आढवा बैठक घेण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र बैठक घेऊन, सुरु असलेल्या प्रकल्पांचा आणि इतर कामकाजाची माहिती मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray Nashik tour) घेणार आहेत.

या आढवा बैठकीलाअन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री दादा भुसे आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आढवा बैठक घेणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

छगन भुजबळ हे नाशिकचे पालकमंत्री आहेत. तर दादा भुसे हे पालघरचे, हसन मुश्रीफ नगरचे, तर गुलाबराव पाटील जळगावचे पालकमंत्री आहेत. हे सर्व त्या त्या जिल्ह्यांच्या आढावा बैठकीला हजर असतील.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकाचवेळी 5 महत्त्वाच्या मंत्र्यांसह नाशिक दौऱ्यावर असल्याने, या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

मंत्रिमंडळ बैठक

दरम्यान, काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकारने महत्त्वाचे चार निर्णय घेतले.  यातील महत्त्वाचा निर्णय म्हणजे सरपंचांची निवड थेट लोकांमधून निवडणुकीद्वारे करण्याऐवजी आता पूर्वीप्रमाणेच निवडून आलेल्या सदस्यांमधून करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे सरपंच आणि सदस्य यांच्यामध्ये सुसंवाद वाढून ग्रामपंचायतींचे कामकाज अधिक सुलभ आणि गतिमान होईलअशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *