उद्धव ठाकरेंकडून सोशल मीडियावर फोटो पोस्ट, युजर्सकडून कौतुक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इन्स्टाग्रामवर नेहमी अॅक्टिव्ह असतात. गेले काही दिवस ते फोटो (CM Uddhav Thackeray post Photo on social media) शेअर करत आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:05 PM, 27 Dec 2019
उद्धव ठाकरेंकडून सोशल मीडियावर फोटो पोस्ट, युजर्सकडून कौतुक

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इन्स्टाग्रामवर नेहमी अॅक्टिव्ह असतात. गेले काही दिवस ते फोटो (CM Uddhav Thackeray post Photo on social media) शेअर करत आहेत. त्यामुळे त्यांचे फोटो चर्चेचा विषय बनत आहेत. आजही (27 डिसेंबर) सकाळी त्यांनी दोन फोटो पोस्ट केले. हे फोटो पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. त्यासोबतच मोठ्या प्रमाणात फोटोला लाईक्स (CM Uddhav Thackeray post Photo on social media) मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

iPhone shot

A post shared by @ uddhavthackeray on

हे फोटो त्यांनी आपल्या फोनमधून काढले आहेत. हे फोटो पोस्ट केल्यावर काही मिनिटात यावर पाच हजारपेक्षा अधिक लाईक्स मिळाले. युजर्संनी फोटो आणि उद्धव ठाकरेंच्या कलेचे कौतुक केले. उद्धव ठाकरेंना पहिल्यापासून फोटोग्राफीची आवड आहे. नेहमीच इन्स्टाग्रावर ते आपले फोटो पोस्ट करत असतात.

उद्धव ठाकरेंनी गेल्या काही दिवसांत निसर्गाचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. पहिल्या फोटोत सुंदर अशी फुलं दिसत आहेत. झाडाच्या मागे उगवत्या सूर्याची किरणं दिसत आहेत. दुसरा फोटोही मिळता जुळता आहे पण त्यात फोकस उगवत्या सूर्यावर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @uddhavthackeray on

उद्धव ठाकरे हे कसलेले राजकारणी असून एक अप्रतिम फोटोग्राफर आहेत. त्यांच्या इन्स्टाग्रामवरही अनेक फोटो त्यांनी क्लिक केलेले आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांचे 71 हजार फॉलोअर्स आहेत. तसेच त्यात निसर्ग, वाइल्डलाईफ, प्राणी, मानवी मुद्रा याशिवाय देशातील संस्कृती आणि विविधतेचे फोटो आहेत.