कोरोनाला घाबरु नका, लढा द्या, मास्कची गरज नाही : मुख्यमंत्री

महाराष्ट्रात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी करु नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी (CM Uddhav Thackeray Corona virus) केले.

कोरोनाला घाबरु नका, लढा द्या, मास्कची गरज नाही : मुख्यमंत्री

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुरेशी (CM Uddhav Thackeray Corona virus) खबरदारी घेतली आहे. नागरिकांनी घाबरु नका, असे आवाहन नागरिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नका, होळी साजरी करताना तिचे स्वरुप मर्यादित ठेवा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबई पाठोपाठ पुणे, नागपूर येथील विमानतळांवर थर्मल स्कॅनिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  पंचतारांकीत हॉटेलमध्ये येणाऱ्या परदेशी नागरिकांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोरोना हा जगाच्या चिंतेचा विषय बनला (CM Uddhav Thackeray Corona virus) आहे. राज्याच्या जनतेला धीर देण्याचे काम सर्वांनी मिळून करणे आवश्यक आहे. मी या संदर्भात गेल्या महिन्याभरापासून आरोग्य विभागाच्या बैठका घेतल्या आहेत. आरोग्य विभागाच्या माध्यमातून पुरेशी खबरदारी घेण्यात येत आहे. मी जी माहिती घेतली त्यानुसार याआधीही हा वायरस होता. पण हा आताच अधिक तीव्र झाला आहे. आधीच्या व्हायरसपेक्षा हा तीव्र आहे. पण जसा बाहेरच्या देशात ज्या तीव्र स्वरुपात आहेत, तसा आपल्या देशात आता तरी नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोनाचा धसका, मास्क घेण्यासाठी धावाधाव, रत्नागिरीत एका मास्कची किंमत…

कोरोनाबाबात नमुने तपासण्याची सुविधा पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत केली आहे. त्यासोबतच मुंबई आणि नागपूर येथेही याची सोय करण्यात आली आहे. राज्यात आवश्यक त्या मास्कचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. प्रसंगी खासगी रुग्णालयांची देखील मदत घेण्यात येत आहे.

तसेच नागरिकांनी मास्क घालून फिरण्याची गरज नाही. जे नागरिक विमानतळ किंवा रुग्णालयात काम करतात. त्यांनी हे मास्क घालण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ज्या विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमाने येतात तेथे तपासणीची सोय करण्यात आली आहे. विमानाची साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पुरेशी खबरदारी बाळगण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी. होळीचा सण साजरा करताना त्याचे स्वरुप मर्यादित ठेवावे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाची धास्ती, मंदिरात दर दोन तासांनी साफ-सफाई, संसर्ग रोखण्यासाठी तीर्थक्षेत्रांकडून विशेष दक्षता

कोरोनाबाबतच्या जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर मोहिम हाती घेण्यात आली असून शाळा, सार्वजनिक ठिकाणे, रेल्वे आणि बसस्थानक या ठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधींसाठी जनजागृतीचे चर्चासत्र घेण्यात येणार असून त्यानंतर आपल्या भागातील नागरिकांचे लोकप्रतिनिधींनी प्रबोधन करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. महाराष्ट्रात कोरोनाचा एकही रुग्ण नाही त्यामुळे नागरिकांनी काळजी करु नये, तर काळजी घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी (CM Uddhav Thackeray Corona virus) केले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *