फासाचा दोर लटकतोय, आरोपी फासावर कधी चढणार?, मुख्यमंत्र्यांची संथ न्यायप्रक्रियेवर खंत

देशातील संथ न्यायप्रक्रियेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. "निर्भयाचं प्रकरण अजूनही सुरुच आहे. फासाचा दोर लटकतोय, आरोपी कधी फासावर चढणार?", असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.

फासाचा दोर लटकतोय, आरोपी फासावर कधी चढणार?, मुख्यमंत्र्यांची संथ न्यायप्रक्रियेवर खंत
Follow us
| Updated on: Feb 16, 2020 | 12:57 PM

नाशिक : देशातील संथ न्यायप्रक्रियेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. “निर्भयाचं प्रकरण अजूनही सुरुच आहे. फासाचा दोर लटकतोय, आरोपी कधी फासावर चढणार?”, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला ( CM Uddhav Thackeray). मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (16 फेब्रुवारी) नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नियोजित इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संथ न्यायप्रक्रियेवर त्यांचं मत व्यक्त केलं. या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई देखील उपस्थित होते (CM Uddhav Thackeray At Nashik).

“लासलगावमध्ये घडलेल्या घटनेचा खटला जलदगतीने करु असं विधान केलं, तर तो न्यायालायचा अपमान आहे. म्हणजे न्यायालय संथगतीने काम करतात असा त्याचा अर्थ होतो. मात्र, निर्भयाचं प्रकरण अजूनही सुरुच आहे. फासाचा दोर लटकतोय, आरोपी कधी फासावर चढणार? अजूनही ब्रिटिश कायदे सुरु आहेत. नवीन आव्हानांनुसार बदललं पाहिजे. सिंहावलोकन झालं पाहिजे. चार खांब नुसते उभे राहिले, या चार खांबानी लोकशाहीचं कर्तव्य पेललं पाहिजे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

“लहानपणापासून हे ऐकत आलोय की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. मी कोर्टाची पायरी चढली नाही भूमीपूजन केलं. नक्कीच आम्ही नूतन इमारतीच्या उद्घाटनाला येऊ. अनेक वकील शिवसैनिकांना ओळखत असतील, कारण त्यांनी अनेक केसेस लढल्या आहेत. न्यायासमोर सर्व सारखे असतील आणि जो दोषी असेल त्याला शिक्षा भोगावीच लागेल असे वकील हवे. आजही देशात न्यायाशास्त्री प्रभुणे यांची परंपरा आहे”, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

शेतकरी माझ्या सरकारचा केंद्रबिंदू

“नाशिक नूतन इमारतीसाठी मी काहीही कमी पडू देणार नाही, पण या इमारतीची गरजच पडायला नको असं माझं मत आहे. असा समाज आपण घडवला पाहिजे. गुन्हे घडणार नाही यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. कायदा जरुर आहे, मात्र त्यापेक्षा महत्वाचे आहेत संस्कार. न्यायमूर्ती घडवण्याचं पहिलं विद्यापीठ माझ्या महाराष्ट्रात झालं पाहिजे. कुठल्याही राज्यात होण्याआधी करा, पण संस्कार कोण करणार? दगडावर शेंदूर फासून जर देव होत असेल तर माणसाचं काय?”, असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं.

“दोषी व्यक्तीचे वकील पत्र स्वीकारावे की नाही, हे वकिलांनी ठरवलं पाहिजे. दोषी व्यक्तीच्या मागे कोणी उभं राहिलं नाही, तर गुन्हेगारालाही समजेल आपल्या मागे कोणी नाही”, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

Non Stop LIVE Update
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.