वितळलेल्या डांबरात अडकल्याने कोब्रा अर्धमेला, सर्पमित्रांकडून जीवदान

चंद्रपूरच्या इको प्रो वन्यजीव संस्था सदस्यांनी एका कोब्रा नागाला (Chandrapur cobra rescue) जीवदान दिले. हा कोब्रा वितळलेल्या डांबरात अडकला होता.

वितळलेल्या डांबरात अडकल्याने कोब्रा अर्धमेला, सर्पमित्रांकडून जीवदान

चंद्रपूर : चंद्रपूरच्या इको प्रो वन्यजीव संस्था सदस्यांनी एका कोब्रा नागाला (Chandrapur cobra rescue) जीवदान दिले. इको प्रो च्या वन्यजीव सदस्यांना शहरातील बिनबा गेट परिसरात एक साप अर्धमेल्या अवस्थेत अडकून पडल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संस्था सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अडकून पडलेला साप एक पूर्ण वाढीचा कोब्रा असल्याचे सदस्यांना लक्षात आले. (Chandrapur cobra rescue)

रस्त्याच्या कडेला असलेल्या वितळलेल्या डांबरात अडकून कोब्रा अर्धमेला झाला होता. सदस्यांनी या कोब्रा सापाला अलगद काढून त्याला शुश्रूषा केंद्रात आणले. कोब्रा सापाला व्यवस्थित हाताळून त्याच्या अंगावर असलेले डांबर स्वच्छ केले. यानंतर या कोब्रा सापाला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले गेले.

चंद्रपूर शहराच्या आसपास मोठे जंगल आहे. या जंगलातून वन्यजीव अथवा सरपटणारे प्राणी शहरात येत असतात. असे प्राणी संकटात सापडल्यावर त्यांच्या बचाव करण्यासाठी इको प्रो सदस्यांनी सतत पुढाकार घेतलाय.

यावेळेस वितळलेल्या डांबरात अडकलेल्या कोब्रा सापाला जीवदान देत इको प्रो सदस्यांनी मोठी कामगिरी बजावली. डांबरी रस्ता पूर्ण झाल्यावर विखुरलेले डांबर नीट साफ करण्याची गरज यानिमित्ताने दिसून येत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *