राज्यात थंड वारे, मुंबईत थंडीचा अनुभव, आता IMD चा काय आहे अंदाज?

उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये वातावरणात वेगाने बदल होताना दिसत आहे. मुंबईचे तापमान सरासरीच्या तुलनेत २ अंशांनी घसरले आहे. मुंबईत काही दिवस थंडी राहणार आहे.

राज्यात थंड वारे, मुंबईत थंडीचा अनुभव, आता IMD चा काय आहे अंदाज?
पुणे तापमानात घसरण
Follow us
| Updated on: Jan 14, 2023 | 8:22 AM

मुंबई : Weather Alert दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी सुरु आहे. अजून काही दिवस थंडी कायम राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १४ ते २० जानेवारीपर्यंत उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी, धुके जाणवेल. दिल्लीत किमान तापमान २ ते ३ अंशांपर्यंत येण्याची शक्यता आहे. कोरड्या हवामानामुळे राज्यात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडल्याचं पाहायला मिळालं. यामुळे किमान तापमानातही घट झाली आहे. अशात उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये वातावरणात वेगाने बदल होताना दिसत आहे. मुंबईचे तापमान सरासरीच्या तुलनेत २ अंशांनी घसरले आहे.

मुंबईत चार दिवस थंडीचे दिल्लीत थंडी कायम असते. परंतु शुक्रवारी रात्रीपासून मुंबईतही थंडी जाणवत आहे. १४ ते १७ जानेवारीला तापमान अधिक घसरणार आहे. पारा १३ अंशापर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाचा आहे. हिवाळ्यात मुंबईत थंडी कधीच नसते. संपुर्ण हिवाळ्यात फक्त एकदा-दोनदाच पारा १२ अंश सेल्सिअसपर्यंत जातो. मात्र, यंदा काही दिवस थंडी राहणार आहे. उत्तरेत अजूनही बर्फवृष्टी होत आहे. त्याचा परिणाम हा सुरु आहे. हवामान खात्याने काही राज्यांत शीतलहर येणार असल्याचा इशारा दिला आहे. या शीतलहरींमुळे मुंबईसह कोकणात पुढील चार दिवसांत थंडी वाढेल. पुढील ४८ तास म्हणजे  किमान तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी घसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. मुंबई तसेच कोकण वगळता संपूर्ण राज्यात १९ जानेवारीपर्यंत कडाक्याची थंडी पडणार असल्याचे आयएमडीने म्हटलंय.

देशांत अनेक ठिकाणी थंडी हवामान विभागानुसार, १५ ते १८ जानेवारी दरम्यान जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये दाट धुके राहणार आहे. त्याच वेळी, १६ ते १८ जानेवारी दरम्यान, मध्य प्रदेशच्या उत्तर भागात दाट ते खूप दाट धुके राहू शकते. बिहारच्या काही भागात पुढील पाच दिवस थंडीचे दिवस राहणार आहेत. उत्तराखंडमध्ये दोन दिवसांत सर्वाधिक थंडी असणार आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड आणि उत्तर प्रदेशमध्ये १५ जानेवारीपासून तीन दिवस थंडी राहणार आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.