यवतमाळमध्ये 89 वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची भीती

यवतमाळ जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या 89 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.

यवतमाळमध्ये 89 वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची भीती

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या 89 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत (Collective Resignations Of 89 Medical Officers). जिल्हाधिकारी देवेंद्रर सिंग यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याच्या निषेधार्थ या आरोग्य अधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. कोरोना काळात 89 आरोग्य अधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने चिंता वाढली आहे (Collective Resignations Of 89 Medical Officers).

मेग्मो संघटनेचे पदाधिकारी कमी मनुष्यबळ अभावी मागील अनेक महिन्यांपासून ग्रामीण भागात अविरत वैद्यकीय सेवा देत आहेत. मात्र, त्यांना एकही दिवस सुट्टी मिळत नाही. सतत काम करत असल्याने त्यांची मानसिकता खचली आहे. त्यात जिल्ह्यातील 23 वैद्यकीय अधिकारी आणि 67 आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहे.

अशावेळी वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 50 राखीव बेड ठेवण्यात यावे. तसेच, कोरोनाच्या रिपोर्टबाबत माहिती सायंकाळी 7 पर्यंत घ्यावी. वैद्यकीय अधिकारी डॉ. बेग यांच्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबाला शासनाने 50 लाख रुपयांची मदत द्यावी. आता सतत काम करीत असल्याने किमान रविवारीची सुट्टी मिळावी, अशा स्वरुपाचे निवेदन घेऊन आज सर्व डॉक्टर यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. मात्र, त्यांना जिल्हाधिकारी देवेंद्रर सिंग यांच्याकडून अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे.

या सर्व वागणुकीविरोधात सामूहिक राजीनामे देत काम बंद आंदोलन करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच, सर्व डॉक्टरांनी जिल्हा प्रशासनाच्या (व्हॉट्सअॅप ग्रुप) सोशल मीडियावरील ग्रुपमधून डॉक्टर आता बाहेर पडले आहेत. डॉक्टरांच्या राजीनाम्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कोलमडणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या आणि प्रशासनाच्या वागणुकीमध्ये सुधारणा व्हावी, अशी या डॉक्टरांची मागणी आहे.

“गेल्या कित्येक महिन्यात आम्ही कुठलाही सण आम्ही कुटुंबासोबत साजरा केला नाही. आई-वडिलांची भेट झाली नाही. मात्र, एक जबाबदारी म्हणून काम करत असतात प्रशासनाने आमच्या विषयी उदासीन भूमिका घेत असल्याने सामूहिक राजीनामा दिला आहे”, असं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Collective Resignations Of 89 Medical Officers

संबधित बातम्या :

तुम्ही माझे कॅमेरे, जबाबदारी तुमच्यावर, मुख्यमंत्र्यांचा रेस्टोरंट मालकांशी संवाद

Restaurant | रेस्टॉरंट ऑक्टोबरपासून पुन्हा उघडण्याची चिन्हं, मुख्यमंत्र्यांकडून गाईडलाईन्सची ‘रेसिपी’

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *