2 अंड्यांसाठी पती-पत्नीचा वाद पोहोचला पोलीस स्टेशनमध्ये, पोलिसांनी असा वापरला ‘अंडे का फंडा’

2 अंड्यांसाठी पती-पत्नीचा वाद पोहोचला पोलीस स्टेशनमध्ये, पोलिसांनी असा वापरला 'अंडे का फंडा'

जोडप्याचं कडाक्याचं भांडण झालं ते पण कशावरून तर चक्क अंड्यावरून. आता हे भांडण फक्त घरातच नाही तर थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्याने एकच खळबळ उडाली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jan 27, 2021 | 2:28 PM

बुलढाणा : नवरा बायकोमध्ये कधी-कधी भांडणं होत असली तरी ते अतुट बंधन असतं हे खरं. पण कधी कधी ते विकोपाला जाण्यास वेळ लागत नाही. असाच एक प्रकार बुलढाण्यात समोर आला आहे. जोडप्याचं कडाक्याचं भांडण झालं ते पण कशावरून तर चक्क अंड्यावरून. आता हे भांडण फक्त घरातच नाही तर थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्याने एकच खळबळ उडाली आहे. (comedy husband wife fight for 2 eggs police solve with strategy buldhana news)

हे आहे बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेडा पोलीस स्टेशन. अनेक घटनांची आणि गुन्ह्यांची नोंद या ठिकाणी होत असते. मात्र, एका विचित्र भांडणामुळे पोलिसही चक्रावून गेले. कारण, हे भांडण होतं पती आणि पत्नीचे आणि तेही चक्क दोन अंड्यांवरून. पतीने संध्याकाळी जेवणासाठी दोन अंडी आणली आणि पत्नीला सांगितलं याची भाजी करून दे. पत्नीने भाजी तर केली मात्र, ती मुलीला खाऊ घातली.

मग, काय पतीदेवाचा राग अनावर झाला आणि झाली भांडणाला सुरुवात झाली. हाच वाद इतका वाढला की पती- पत्नीला थेट पोलीस ठाण्यात जाण्याची वेळ आली. या कॉमेडी भांडणामुळे गावकऱ्यांनीसुद्धी पोलीस ठाण्यात गर्दी केली.

दरम्यान, ठाणेदार जितेंद्र आडोळे आणि दुय्यम ठाणेदार दीपक राणे यांनी या वादाचे मुळ शोधले असता हे भांडण फक्त दोन अंड्यांवरून झाल्याचं समोर आलं. त्यामुळे ठाणेदारदेखील अवाक् झाले. त्यामुळे एकतर गुन्हा दाखल करावा की भांडण सोडवावे या पेचात ते पडले. मात्र पती-पत्नी दोघांनाही शांत करत पोलिसांनीच दोन अंडी विकत आणली आणि त्यांच्या हवाली केली. सगळ्यात विशेष म्हणजे जेव्हा पत्नीने दुसरी भाजी बनवून पतीला दिली. तेव्हा कुठे वाद मिटला.

या सगळ्या भांडणामुळे गावकऱ्यांना हसण्याची एकच संधी मिळाली आहे. त्यात पोलिसांनी जो काही पर्याय काढला त्याला तर अंडे का फंडा असंच म्हणावं लागेल. (comedy husband wife fight for 2 eggs police solve with strategy buldhana news)

संबंधित बातम्या – 

अरे देवा! बिटकॉइनच्या रुपात या व्यक्तीकडे आहेत 1800 कोटी, पण विसरला पासवर्ड

मगरीशी बोलत पाठीवर फिरवत होता हात, नंतर असं काही झालं की VIDEO पाहून तुम्ही थक्क व्हाल

दुसऱ्या महिलेचा फोटो पाहत होता पती, पत्नीने थेट केला चाकून हल्ला; नंतर समोर आलं सत्य

(comedy husband wife fight for 2 eggs police solve with strategy buldhana news)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें