LIVE : उद्धव ठाकरे सहकुटुंब विठ्ठलाच्या चरणी

मुंबई : आधी ‘चलो अयोध्या’ करत उत्तर प्रदेशात जाऊन आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख हे आता पंढरपुरात धर्मसभेला उपस्थित राहणार आहेत. ही धर्मसभा कुणी साधू-संतांनी नव्हे, तर शिवसेनेनेच आयोजित केली आहे. या धर्मसभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आपली पक्षीय ताकद सुद्धा दाखवणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या धर्मसभेकडे राजकीय वर्तुळासह सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. LIVE UPDATE :  …

LIVE : उद्धव ठाकरे सहकुटुंब विठ्ठलाच्या चरणी

मुंबई : आधी ‘चलो अयोध्या’ करत उत्तर प्रदेशात जाऊन आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख हे आता पंढरपुरात धर्मसभेला उपस्थित राहणार आहेत. ही धर्मसभा कुणी साधू-संतांनी नव्हे, तर शिवसेनेनेच आयोजित केली आहे. या धर्मसभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आपली पक्षीय ताकद सुद्धा दाखवणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या धर्मसभेकडे राजकीय वर्तुळासह सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

LIVE UPDATE : 

 

धर्मसभेच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेनेने राज्य परिवहन महामंडळाच्या मालकीच्या मैदानाची निवड केली आहे. तब्बल 27 एकरावर हे मैदान पसरले असून, सुमारे 5 लाख शिवसैनिक आणि भाविक या धर्मसभेला उपस्थित राहणार असल्याचा अंदाज आहे.

या महासभेतून पुढच्या राजकीय आखाड्याचे संकेत मिळणार असल्याने या सभेला फारच महत्व प्राप्त झाले आहे. उद्धव ठाकरे सकाळी विठ्ठलाचे दर्शन घेतील. दुपारी 3 ते 5 वाजता सभेआधी बोधले महाराज आणि भास्कर महाराज याचं मार्गदर्शन किर्तन होईल. त्यानंतर 6 ते 7 वाजेदरम्यान उद्धव ठाकरे यांची सभा होईल, यानंतर 6 वाजता चंद्रभागेच्या इस्कॉन घाटावर उद्धव ठाकरे महाआरती करतील. ही सभा अध्यात्मिक आणि धर्मसभा असल्याने कुठल्याही राजकीय नेत्यांचा यात प्रवेश नसेल, असे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सांगितले.

80 फूट लांब आणि 60 फूट रुंदीच्या मुख्य स्टेजवर उद्धव ठाकरे त्यांचे कुटुंबीय आणि शिवसेना नेते असणार आहेत. या स्टेजवर राज्यातील साधू आणि वारकरी संतही उपस्थित असतील. या स्टेजसमोर भव्य राममंदिराची रांगोळीही साकारण्यात येणार आहे.

कसा असेल उद्धव ठाकरेंचा दौरा?

१) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सकाळी ११:१५ वाजता मातोश्री निवास्थानाहून कुटुंबासह पंढरपूरला निघतील.

२) चाटर्ड विमानाने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर आणि रामनाथ पंडित दुपारी १२:३० वाजता मुंबई विमानतळावरून सोलापरूसाठी टेक ऑफ करतील.

३) चाटर्ड विमान सोलापूर विमानतळावर दुपारी १:३० वाजता लँडिंग करेल.

४) ठाकरे कुटुंब सोलापूर विमानतळावरून हेलीकॉप्टरने दुपारी १:४५ मिनटांनी पंढरपूरसाठी उड्डाण करेल.

५) ठाकरे कुटुंब दुपारी २:१० मिनटांनी हेलीकॉप्टरने पंढरपूर हेलिपॅडवर लँडिंग करेल.

६) पंढरपूर शहरात दाखल झाल्यावर ठाकरे कुटुंब शासकीय निवास्थानी जाणार आहेत.

७) ठाकरे कुटुंब शासकिय निवास्थानी येतील. तीथे वारकरी सांप्रदयातील मान्यवरांच्या भेटी होणार आहेत.

८) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासह विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी संध्याकाळी ४ वाजता पोहचणार आहेत.

९) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पंढरपूर येथील जाहीर महासभा दुपारी ३ वाजता सुरू होईल. सुरुवातीला वारकरी संप्रदयातील मान्ययवर महाराजांचे निरुपण होईल.

१०) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे चंद्ररभागा मैदानातील महासभा स्टेजवर संध्याकाळी ४:३० येतील.

११) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संध्याकाळी ४:४५ वाजता मुंबई ते पंढरपूर अशी ‘विठाई’ एस टी बस सेवेचा शुभारंभ होणार आहे.

१२) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण संध्याकाळी ५ वाजता सुरू होईल.

१३) शिवसेना पंढरपूर महासभा संध्याकाळी ६ वाजता संपेल.

१४) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासह पुन्हा शासकिय निवास्थानी येतील.

१५) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासह संध्याकाळी ६:४५ वाजता चंद्रभागा किनारी इस्कॉन घाटावर महाआरतीसाठी पोहचतील

१६) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासह इस्कॉन घाट परीसरातून कारने पुण्याच्या दिशेने निघतील.

१७) ठाकरे कुुटुंब पुणे विमानतळावर रात्री ११ पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

१८) ठाकरे कुटुंब चाटर्ड विमानाने मुंबईसाठी ११:३० वाजता टेक ऑफ करतील.

१९) ठाकरे कुटुंब मुंबई विमानतळावर रात्री १२ वाजता पोहचतील.

२०) ठाकरे कुटुंब मातोश्रीवर रात्री १२:३० वाजता पोहचतील.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *