अखेर काँग्रेसचा पुण्याचा उमेदवार ठरला

पुणे : अनेक दिवसांपासून लोकसभेसाठी काँग्रेसच्या पुण्यातील उमेदवाराबाबत सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसने माजी आमदार मोहन जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. जोशी यांच्याविरुद्ध भाजपकडून महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट मैदानात आहेत, तर वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मागील बराच काळ आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा पुण्यातील …

Pune Congress, अखेर काँग्रेसचा पुण्याचा उमेदवार ठरला

पुणे : अनेक दिवसांपासून लोकसभेसाठी काँग्रेसच्या पुण्यातील उमेदवाराबाबत सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसने माजी आमदार मोहन जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. जोशी यांच्याविरुद्ध भाजपकडून महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट मैदानात आहेत, तर वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मागील बराच काळ आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा पुण्यातील उमेदवार कोण असणार याविषयी तर्कवितर्क लावले जात होते. संभाजी ब्रिगेडच्या प्रविण गायकवाडांपासून अगदी अरविंद शिंदे, सुरेखा पुणेकर यांच्या नावाचीही चर्चा झाली. मात्र, अखेर काँग्रेसच्या केंद्रीय समितीने मोहन जोशी यांना उमेदवारी देत हा पेच संपवला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच उमेदवार ठरत नसल्याने पुणे काँग्रेसने उमेदवाराशिवायच प्रचार मोहिमेलाही सुरुवात केली होती.

..म्हणून मी उमेदवारी मागे घेतली

आपल्या उमेदवारीविषयी बोलताना प्रविण गायकवाड म्हणाले होते, ‘पक्षाने कुणाला तिकीट द्यावं हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे. पुण्यात ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी आमदार, माजी नेत्यांनी विनंती केली की पक्षातील उमेदवाराला उमेदवारी द्यावी. मी निश्चित त्याचा सन्मान करतो. त्यामुळेच मी दोन दिवसांपूर्वी माजी उमेदवारी मागे घेतली. काँग्रेसने तातडीने उमेदवार जाहीर करावा हा त्यामगाचा हेतू होता. भाजपने गिरीश बापटांची उमेदवारी जाहीर होऊन 8 दिवस झाले. निवडणूक कालावधी कमी होत आहे, आपल्याला पुण्यातील जागा जिंकायची आहे, त्यामुळे लवकर उमेदवार जाहीर करावा अशी माझी इच्छा होती. त्यामुळे माझी उमेदवारी मागे घेतली.’

कोण आहेत मोहन जोशी?

  • विधान परिषदेचे माजी आमदार
  • जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस
  • अध्यक्ष, महाराष्ट्र हरिजन सेवक संघ
  • 1999 मध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती
  • या निवडणुकीत ते 2 लाख 12 हजार मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकावर होते
  • 1986 मध्ये ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते
  • 2007 पासून 2013 पर्यंत त्यांनी वेगवेगळ्या राज्यात निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहिले

संबंधित बातम्या 

…तर त्यांच्यासाठी शंभर टक्के ताकदीने काम करु : प्रविण गायकवाड

प्रविण गायकवाड पुन्हा शर्यतीत, काँग्रेसमध्ये आज प्रवेश करणार  

काँग्रेसकडे उर्मिलासाठी वेळ, माझ्यासाठी नाही, प्रविण गायकवाडांची माघार  

सुरेखा पुणेकर 3 दिवसांपासून दिल्लीत, काँग्रेसकडून लावणी सम्राज्ञीला पुण्याचं तिकीट? 

पुणे काँग्रेस भवनात शुकशुकाट, उमेदवार जाहीर करा, कार्यकर्त्यांची मागणी  

बापटांविरोधात पुण्यात काँग्रेसकडून ‘ही’ पाच नावं चर्चेत!   

युती आणि आघाडी, कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार लढणार?   

उदयनराजेंचा पराभव निश्चित, सुप्रिया सुळे लाखाने हरतील : संजय काकडे  

पाहा व्हिडीओ:

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *