‘नितीन गडकरी पंतप्रधान झाले तर…’, नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य

"आम्हाला तर आनंदच होईल नागपुरचा माणूस, महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान झाला तर आनंदच होईल. लवकर त्यांनी पंतप्रधान व्हावं. आमच्या त्यांना शुभेच्छा. गडकरींच्या मनात छुपा अजेंडा आणि स्वप्न आहेत. नितीन गडकरींना पंतप्रधान करण्याचा प्रचार ते नेहमी नागपुरात करत आले. त्यांच्या मनात तशी इच्छा आहे", असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

'नितीन गडकरी पंतप्रधान झाले तर...', नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
Follow us
| Updated on: Sep 15, 2024 | 11:05 PM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधानपदाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलं. “आम्हाला तर आनंदच होईल नागपुरचा माणूस, महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान झाला तर आनंदच होईल. लवकर त्यांनी पंतप्रधान व्हावं. आमच्या त्यांना शुभेच्छा. गडकरींच्या मनात छुपा अजेंडा आणि स्वप्न आहेत. नितीन गडकरींना पंतप्रधान करण्याचा प्रचार ते नेहमी नागपुरात करत आले. त्यांच्या मनात तशी इच्छा आहे. ती इच्छा एकदा पूर्ण झाली तर बरं होईल. विरोधकांनी ऑफर दिली होती तर त्याचे नाव गडकरींनी सांगावे”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. काँग्रेसवर आरोप करून तुम्ही मोठे झालात. किती वर्ष काँग्रेसला शिव्या घालणार? तुम्ही खोटा प्रचार केला. देशातल्या मुठभर लोकांना मोठं केलं आणि गरिबाचा घास हिरावून घेतला. काँग्रेस नसतं तर हा देशच पारतंत्र्यात गेला असता. खोटे आरोप लावून यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही”, असं नाना पटोले म्हणाले.

“महाराष्ट्रातलं सरकार नौटंकीबाज सरकार आहे. कर्नाटकात काय चाललं यापेक्षा ‌गुजरातमध्ये काय चाललं ‌ते बघा. गुतरातची कहाणी सांगा? गुजरात धार्जिणे जे लोक बसलेले आहेत, काही लोक गणपती मुर्तीची विटंबना करू इच्छित आहेत आणि कर्नाटकातील आमचं सरकार गणेश मुर्तीची विटंबना होवू नये याचा विचार करतंय. कोणत्याही गोष्टीचा विपर्यास कसा करायचा आणि लोकांची दिशाभूल कशी करायची हे फडणवीसांसोबतच्या लोकांचं टेक्निक. लोकांनी खोट्या बातम्यांना बळी पडू नये”, असं आवाहन नाना पटोले यांनी केलं.

“आमची मुख्यमंत्रीपदाची लढाई नाही. ना उद्धव ठाकरे, ना पवार आणि ना नाना पटोले. आमची लढाई ही भ्रष्ट सरकार विरोधातील आहे. गुजरातला आपला महाराष्ट्र विकला जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा लुटीचा इतिहास फडणवीसांनी मांडला होता. आम्ही जे म्हटलं तो इतिहासकारांचा शब्द होता. त्याचा विपर्यास करण्याचं काम फडणवीस करत आहेत. आज महाराष्ट्राला लुटून गुजरातला नेण्याचं पाप शिंदे आणि फडणवीस करत आहेत. या परिस्थीतीची त्यांना माहीती नसेल तर तो त्यांचा प्रश्न”, असं नाना पटोले म्हणाले.

जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'.
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द.
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?.
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी...
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी....
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या....
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर.
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?.
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....