उजनीच्या पाण्यावरुन प्रणिती शिंदे आक्रमक; काँग्रेस-राष्ट्रवादीत संघर्षाची शक्यता

येत्या काळात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. |

उजनीच्या पाण्यावरुन प्रणिती शिंदे आक्रमक; काँग्रेस-राष्ट्रवादीत संघर्षाची शक्यता
प्रणिती शिंदे, काँग्रेस आमदार

सोलापूर: उजनी धरणाच्या 5 टीएमसी पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला असून उजनीतील 5 टीएमसी पाणी इंदापुराला घेऊन जाऊ दिले जाणार नाही. ‘प्राण जाये, पर पाणी न जाये’, अशी भूमिका सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे (praniti shinde) यांनी घेतलीय. त्यामुळे येत्या काळात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (MLA praniti shinde aggressive on Ujni dam water)

सोलापूर जिल्ह्यासाठी असणाऱ्या उजनी धरणातील पाणी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांच्या मतदार संघातील 22 गावांसाठी नेल्याचा आदेश काढल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. त्या अनुषंगाने आज प्रणिती शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेवून ‘प्राण जाये पर पाणी न जाये’, ही भूमिका त्यांनी घेतलीय. सोलापूरच्या हक्काचे एक थेंब देखील पाणी नेऊ दिलं जाणार नाही, असे प्रणिती शिंदे यांनी सांगितले.

सोलापूरच्या वाट्याच्या पाण्याचा एक थेंबही इंदापूरला गेला तर राजकारणातून संन्यास घेईन: दत्तात्रय भरणे

उजनी धरणातील सोलापूर जिल्ह्यासाठी राखून ठेवलेल्या पाणीसाठ्यातील एक थेंबही इंदापूरला गेला तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असे वक्तव्य राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी केले. सोलापूरच्या वाटणीच्या पाण्याचा एक थेंबही इंदापूरला जाणार नाही, या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. त्यानंतरही सोलापूर जिल्ह्याला डावलून इंदापूरला पाणी दिले तर मी मंत्रिपद आणि आमदारकी सोडून राजकारणातून संन्यास घेईन, असे भरणे यांनी म्हटले होते.

सोलापूरचं पाणी आधी बारामती, आता इंदापूरला पळवलं, राष्ट्रवादी पाणी चोर, भाजपचा हल्ला; वाचा काय आहे वाद

सांडपाण्याच्या नावाखाली सोलापूरच्या उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उजनीतून पाणी उचलून इंदापुरात नेण्यासाठी लाकडी निंबोळी योजनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्तक्षेपामुळेच हे पाणी वळवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्याला सोलापूरकरांनी विरोध केला आहे.

या कृत्याचा निषेध म्हणून सोलापुरात सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी पाणी बचाव संघर्ष समिती स्थापन केली आहे. या समितीने येत्या 1 मे रोजी सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी पळवल्याने जिल्ह्यातील उसाचे क्षेत्रही निम्मे कमी होऊ शकते. या विरुध्द जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदार व आमदारांनी या निर्णयाचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

माझ्या भाकरीसाठी दुसऱ्याची भाकर कधी हिरावून घेणार नाही

(MLA praniti shinde aggressive on Ujni dam water)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI