आठ वर्षाच्या अहिल्याने कॅन्सरग्रस्तांसाठी केले केस दान; काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांच्या मुलीचं स्तुत्य पाऊल

सध्याची आहार आणि अनियमित जीवनशैली यामुळे कॅन्सरचे प्रमाण सर्वत्र वाढले आहे .या आजाराच्या उपचारादरम्यान होणाऱ्या किमोथेरपींमधून रुग्णांच्या डोक्यावरील केस हे पूर्णपणे गळून जातात. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये प्रचंड निराशा निर्माण होऊन हा आजार त्यांना क्लेशदायक वाटू लागतो.

आठ वर्षाच्या अहिल्याने कॅन्सरग्रस्तांसाठी केले केस दान; काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांच्या मुलीचं स्तुत्य पाऊल
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 5:25 PM

मुंबई : कॅन्सरचे( cancer ) उपचार घेत असलेल्या व्यक्तींमध्ये किमोथेरेपी दरम्यान केस गळणे किंवा अलोपेसियाचा त्रास होणे ही बाब रुग्णांचं मानसिक खच्चीकरण करणारी असते. मात्र या रुग्णांमध्ये पुन्हा चैतन्य निर्माण होऊन या आजारावर मात करता येईल यासाठी अनेक लोक आपापल्या पध्दतीने प्रयत्न करीत असतात, त्यातच आता शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या डॉ. मैथिली व सामाजिक -राजकीय क्षेत्रात काम करणारे सत्यजीत तांबे(Congress leader Satyajit Tambe) यांच्या अवघ्या आठ वर्षांची कन्या अहिल्या हिने स्वयंस्फूर्तीने या रुग्णांच्या केसरोपणाकरीता आपले केस कापून या रुग्णांकरता दिले आहेत.

सध्याची आहार आणि अनियमित जीवनशैली यामुळे कॅन्सरचे प्रमाण सर्वत्र वाढले आहे .या आजाराच्या उपचारादरम्यान होणाऱ्या किमोथेरपींमधून रुग्णांच्या डोक्यावरील केस हे पूर्णपणे गळून जातात. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये प्रचंड निराशा निर्माण होऊन हा आजार त्यांना क्लेशदायक वाटू लागतो.

कॅन्सरवर वेळीच उपचार केल्यास तो नियंत्रित करण्यात येतो. याचबरोबर अनेक रुग्णांवर केस रोपण करून त्यांना पूर्वस्थितीतील जीवन अनुभवता येते. त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या मानसिक स्थितीवरही होत असतो. तसंच मानसिक स्थिती चांगली राहिल्याने रुग्ण उपचारांनाही उत्तम प्रतिसाद देतात.

अशा रुग्णांचे काही व्हिडीओ इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या चिमुकल्या अहिल्याने पाहिले. बऱ्याच दिवसांपासून ती त्याबाबत चिंताक्रांत होती. अत्यंत संवेदनशीलपणे तिने या रुग्णांना आपण काय मदत करू शकतो, याचा विचार केला. अहिल्याने ग्रेटा थनबर्ग आणि मलाला युसुफझाई यांची कहाणी तिच्या आजीकडून म्हणजेच संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्याकडून ऐकली होती. ग्रेटाने ज्याप्रकारे पर्यावरण रक्षणासाठी लढा सुरू केला आहे किंवा मलालाने वयाच्या ११ व्या वर्षी तालिबान्यांसमोर न झुकता शिक्षणाचा निर्धार कायम ठेवला त्यातून प्रेरणा घेऊन खेळण्या-बागडण्याच्या वयात अहिल्याने स्वत:हून हे केस देण्याचा निर्णय घेतला.

एवढ्या लहान वयात अशी समज दाखवणं हेच कौतुकास्पद आहे. त्याच बरोबर कॅन्सरग्रस्त रुग्णांना त्यामुळे या आजाराविरोधात लढण्यासाठी ताकदही मिळेल. केस दानाच्या चळवळीलाही अहिल्याच्या या उदाहरणामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.

महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या तांबे परिवारातील अहिल्याच्या रुग्णांप्रती असलेल्या आत्मीयतेचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.

कर्करोग ग्रस्त लोक, विशेषता लहान मुलांना कर्करोगाच्या उपचाराने थेरपी दरम्यान केस गळणे किंवा अलोपेसियाचा त्रास होतो या अत्यंत क्लेशदायक असतो. माझी आठ वर्षाची मुलगी आहिल्या हिचा मला अभिमान वाटतो कि,तीने स्वतःहून कर्करोगांच्या रुग्णांसाठी निस्वार्थपणे केस दान केले आणि या आजाराशी लढणाऱ्या रुग्णांबद्दल एक आत्मीयता व्यक्त केली. एक वडील म्हणून तिची ही संवेदनशीलता माझी छाती अभिमानाने फुलवतेच पण समाजासाठी आणखी काम करत राहण्याची प्रेरणा देखील देते . एवढेच नाही तर नवी पिढी अशा प्रकारे घडताना पाहून मनात चांगल्या भविष्याची आशा देखील जागृत झाली असल्याची प्रतिक्रिया सत्यजीत तांबे यांनी दिली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.