मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंवर कारवाई करा, काँग्रेस आमदारांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नियमबाह्य कामं केल्याचा आरोप करत काँग्रेस आमदार विकास ठाकरे (Congress MLA Vikas Thackeray) यांनी कारवाईची मागणी केली आहे.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंवर कारवाई करा, काँग्रेस आमदारांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

नागपूर : नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नियमबाह्य कामं केल्याचा आरोप करत काँग्रेस आमदार विकास ठाकरे (Congress MLA Vikas Thackeray) यांनी कारवाईची मागणी केली आहे. विकास ठाकरे यांनी याबाबत राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. त्याचबरोबर आपण हा मुद्दा आगामी अधिवेशनात उचलणार असल्याची माहितीदेखील विकास ठाकरे यांनी दिली आहे (Congress MLA Vikas Thackeray).

“गेल्या तीन महिन्यात अनेक तक्रारी आल्या. माझ्या मतदारसंघात तीन विषय होते. त्याबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून सांगितलं आहे. शहरातील बाजार बंद केले आणि लोकांच्या घरासमोर बाजार भरवले. जो बाजार सुरु आहे तो बंद करायचा आणि सामान्य जनतेच्या घरासमोर बाजार भरवायचा, ही कोणती पद्धत आहे?” असा सवाल आमदार विकास ठाकरे यांनी केला.

“नगरसेवक, आमदार अशा लोकप्रतिनिधींकडे तक्रारी येतात. ते प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांकडे गेले तर अधिकाऱ्यांनी काय करावं, याचं भान ठेवलं पाहिजे. अधिकाऱ्यांकडून काम होत नसेल तर त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्याचा अधिकार लोकप्रतिनिधींना आहे. आम्ही जे आरोप लावले त्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर कारवाई होईलच”, असं विकास ठाकरे म्हणाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांच्याकडून नागपूर शहरात अनेक महत्त्वपूर्ण आणि कठोर निर्णय घेण्यात आले. त्यांच्या काही निर्णयांवर अनेकवेळा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे आमदार विकास ठाकरेदेखील मुंढे यांच्या कामांवर नाराज आहेत. काँग्रेस आणि मुंढे यांच्यात गेल्या दीड महिन्यांपासून मतभेद सुरु आहेत.

संबंधित बातम्या :

…तर संपूर्ण नागपूर शहर कोविडच्या विळख्यात, तुकाराम मुंढेंकडून भीती व्यक्त

Congress Upset | निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्याने काँग्रेस नाराज, स्वतंत्र बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *