राज ठाकरेंनी कुठेही एक जागा लढावी आणि डिपॉझिट वाचवून दाखवावं : विनोद तावडे

राज ठाकरेंनी कुठेही एक जागा लढावी आणि डिपॉझिट वाचवून दाखवावं : विनोद तावडे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. यानंतर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली. राज ठाकरे यांचं वक्तव्य म्हणजे केवळ नाटक होतं, इतकंच नाही तर तर काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन त्यांनी कुठेतरी एक जागा लढावी आणि आपलं डिपॉझिट वाचवून दाखवावं, असं आव्हान विनोद तावडेंनी दिलं.

अजूनही सैन्याच्या कामगिरीवर बोलून ते फक्त सैन्याचा अपमान करतात असं नाही, तर ते पाकिस्तानचा हिरो होऊ इच्छित आहेत का? असा थेट सवाल विनोद तावडे यांनी केला. पोपटाचा रंग हिरवा असतो, हा पोपट पाकिस्तानचा नाही ना, असा टोलाही त्यांनी लगावला.

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत मोदी-शाह या जोडीविरोधात प्रचार करणार असल्याचं सांगितलंय. शिवाय भाजपविरोधात मतदान करण्यासाठी आवाहन करण्याचे आदेशही त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले. राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते मोदींपर्यंत टीका केली.

पाहा राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *