वर्ध्यात भाजपमध्ये घमासान, उमेदवारीसाठी मेघे-तडस संघर्ष शिगेला

वर्धा : गेल्या काही दिवसांपूर्वी तेली समाज मेळाव्याच्या निमित्ताने पेटलेला मेघे आणि तडस संघर्ष पुन्हा उफाळून आल्याचे दिसून येत आहे. विद्यमान खासदार रामदास तडस यांच्याऐवजी वर्ध्यातील नेते दत्ता मेघे यांचे पुत्र सागर मेघे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी सागर मेघे यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी सागर मेघे यांनी पक्षाला उमेदवारी मागण्याचे आवाहन केले आहे. वर्ध्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज नागपूर येथील मेघे यांच्या निवासस्थानी भेट …

वर्ध्यात भाजपमध्ये घमासान, उमेदवारीसाठी मेघे-तडस संघर्ष शिगेला

वर्धा : गेल्या काही दिवसांपूर्वी तेली समाज मेळाव्याच्या निमित्ताने पेटलेला मेघे आणि तडस संघर्ष पुन्हा उफाळून आल्याचे दिसून येत आहे. विद्यमान खासदार रामदास तडस यांच्याऐवजी वर्ध्यातील नेते दत्ता मेघे यांचे पुत्र सागर मेघे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी सागर मेघे यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी सागर मेघे यांनी पक्षाला उमेदवारी मागण्याचे आवाहन केले आहे.

वर्ध्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज नागपूर येथील मेघे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. बैठकीत माजी खासदार सुरेश वाघमारे आणि आमदार पंकज भोयर यांच्यासह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सभापतींचा समावेश होता. स्वतः माजी खासदार सुरेश वाघमारे या बैठकीला उपस्थित असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

वर्ध्यात तडस-मेघे वाद, सागर मेघेंची लोकसभेची तयारी

वर्ध्यात भाजपात मोठा संघर्ष निर्माण झाला असल्याचे या सभेतून स्पष्ट झाले आहे. पक्षाने तिकीट दिल्यास निवडणूक लढणार असल्याचा निर्णय या बैठकीत सागर मेघे यांनी सांगितला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तडस गट आणि मेघे गट अशी गटबाजी वाढण्याची शक्यता आता या मोर्चेबांधणीमुळे वाढली आहे.

वर्धा लोकसभा मतदार संघ?

काँग्रेसच्या गडाला खिंडार पाडत भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत वर्ध्याचा बालेकिल्ला हस्तगत केला होता. मात्र आता भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या चार प्रमुख राजकीय पक्षांनी 2019 च्या लोकसभा रणसंग्रामासाठी कंबर कसली आहे. पण वर्धा जिल्ह्यात अद्याप अस्तित्व नसलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून संपर्क आणि संगठन बांधणीत पुढाकार घेतला आहे. काही नेते गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत, तर काहींनी नुसतीच चर्चा करून वातावरण तयार करायला सुरुवात केली आहे.

भाजपच्या गोटात विद्यमान खासदार रामदास तडस यांची पकड घट्ट असली तरी दत्ता मेघे यांच्या कुटुंबातील सदस्य सागर मेघे (मेघे यांचा मुलगा, मागील निवडणुकीत काँग्रेसकडून लढले होते) तसेच पक्षातील नाराज असणारे मोठे नेते गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. काँग्रेसमध्ये प्रभा राव यांच्या कन्या चारुलता टोकस यांच्या नावाची चर्चा आहे.

लोकसभा निवडणूक 2014

उमेदवार   राजकीय पक्ष  मिळालेली मते    टक्के         

रामदास तडस  भाजप         537518             53.5

सागर मेघे        काँग्रेस         321735               31.75

चेतन पेंदाम     बसपा           90866                 8.97

निवडणुकीच्या तारखा जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

संबंधित बातम्या :

लोकसभा निवडणूक 2019 : प्रचार, मतदान ते निकाल, A टू Z माहिती

तुमच्या मतदारसंघात कधी मतदान? पाहा इथे

तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही? इथे चेक करा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *