कोरोनाचा विस्फोट! राज्यात 55,469 नव्या कोरोना रुग्णांचे निदान

राज्यात आज 55,469 नव्या कोरोना रुग्णांचे निदान झालेय. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 31,13,354 झाली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:29 PM, 6 Apr 2021
कोरोनाचा विस्फोट! राज्यात 55,469 नव्या कोरोना रुग्णांचे निदान
new corona patients found 55469

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकडून वीकेंड लॉकडाऊनचीही घोषणा करण्यात आलीय. विशेष म्हणजे या लॉकडाऊन काळात सलून आणि जीम पूर्णतः बंद करण्यात आलेत. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. राज्यात आज 55,469 नव्या कोरोना रुग्णांचे निदान झालेय. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 31,13,354 झाली आहे. (Corona blast! found of 55,469 new corona patients in the state)

सध्या राज्यातील मृत्युदर हा 1.81 टक्के एवढा

तर 297 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचीही नोंद झालीय. सध्या राज्यातील मृत्युदर हा 1.81 टक्के एवढा आहे. राज्यात आज 34, 256 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आज एकूण 25,83,331 कोरोनाबाधित रुग्ण बरे झालेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.98 टक्के एवढे झालेय.

22,797 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये

राज्यात आज तपासण्यात आलेल्या 2,09,17,486 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 31,13,354 (14.88 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत. सध्या राज्यात 24,55,498 व्यक्ती होम क्वारंटाईन असून, 22,797 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

ठाण्यात दिवसभरात 1,883 जणांना कोरोनाची बाधा

ठाण्यात आज 1,883 जणांना कोरोना संसर्गाची लागण झालीय. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 87,289 वर गेलाय, आतापर्यंत एकूण 72,892 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. ठाण्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 84 टक्क्यांवर आहे. सध्या 12,980 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात 2020 जणांना कोरोनाची बाधा

अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मोठी रुग्णवाढ झालीय. अहमदनगर जिल्ह्यात 2020 जणांना कोरोनाची बाधा झाली. जिल्ह्यातील राहाता, संगमनेर, अकोले तालुक्यात मोठी रुग्णवाढ होतेय. कोरोनाबाधितांच्या आकड्यांसह मृत्यूदरही वाढलाय. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2904 वर असून, आज दिवसभरात 156 जण कोरोनामुक्त झालेत. जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची संख्या 53508 वर गेलीय.

संबंधित बातम्या

Maharashtra Lockdown : ‘लॅाकडाऊन नियमावलीचा सरकारने पुनर्विचार करा, अन्यथा उद्रेक होईल’, उदयनराजेंचा इशारा

Mumbai Corona Update : मुंबईने कोरोना रुग्णसंख्येत 10 हजाराचा टप्पा ओलांडला, दिवसभरात 31 जणांचा मृत्यू

Corona blast! found of 55,469 new corona patients in the state