Maharashtra Coronavirus LIVE Update : आज राज्यात आढळले कोरोनाचे 9677 नवे रुग्ण, 156 बाधितांचा मृत्यू 

| Updated on: Jun 26, 2021 | 12:11 AM

आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. राज्यातीलच नाही तर देशभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच, रोजचे नवे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : आज राज्यात आढळले कोरोनाचे 9677 नवे रुग्ण, 156 बाधितांचा मृत्यू 
Corona Update

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. राज्यातीलच नाही तर देशभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच, रोजचे नवे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. तसेच, काहीच आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने त्यासाठीची तयारीही सुरु करण्यात आली आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Jun 2021 10:48 PM (IST)

    आज राज्यात आढळले कोरोनाचे 9677 नवे रुग्ण, 156 बाधितांचा मृत्यू 

    आज राज्यात कोरोनाचे 9677 नवे रुग्ण आढळले

    आज राज्यात कोरोना 156 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

    आज राज्यात एकूण 10138 जण कोरोना मुक्त

  • 25 Jun 2021 06:34 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 258 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ, 246 रुग्णांना डिस्चार्ज

    पुणे कोरोना अपडेट

    दिवसभरात 258 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

    – दिवसभरात 246 रुग्णांना डिस्चार्ज.

    – पुण्यात करोनाबाधीत 17 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 11

    – 314 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

    – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 477084

    – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2522

    – एकूण मृत्यू -5560

    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 46062

    – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5795

  • 25 Jun 2021 04:42 PM (IST)

    ICMR कडून मिरजेत नागरिकांच्या रक्ताचे नमुने संकलन, रोगप्रतिकारक शक्तीबाबत अनुमान काढला जाणार 

    सांगली - मिरजेत ICMR च्या केंद्रीय पथकाकडून 6 ते 18 वर्षे वयोगटातील नागरिकांच्या रक्ताचे नमुने संकलन सुरु

    रक्ताच्या तपासणीतून कोरोना रोगप्रतिकारक शक्तीबाबत अनुमान काढला जाणार

  • 25 Jun 2021 12:01 PM (IST)

    सांगलीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मनपा आयुक्त रस्त्यावर

    सांगली -

    मनपा क्षेत्रात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मनपा आयुक्त नितीन कापडणीस रस्त्यावर

    महापालिका क्षेत्रात आजपासून ओंनस्पॉट रॅपिड टेस्टिंग,

    मनपा आयुक्त कापडणीस यांच्यासह टीम रस्त्यावर,

    सांगली शहरातील बाजारपेठेत नागरिक, व्यापारी, कामगार यांची कोरोना चाचणी सुरू

    मनपा आरोग्य टीम पीपीई किट सहित रस्त्यावर

  • 25 Jun 2021 09:46 AM (IST)

    मुंबईत 67 ठिकाणी लसीकरण, केंद्राबाहेर लोकांच्या रांगाच रांगा

    मुंबईत आज ६७ ठिकाणी १८ ते ४४ आणि ४५ च्या पुढील लोकांच्या लस दिली जाणार…. - मात्र बीकेसी जंबो कोवीड वॅक्सिनेशन सेंटरबाहेर लोकांमध्ये गोंधळाचं वातावरण

    मनपा आरोग्य कर्मचार्यांशी लोकांची बाचाबाची

    वाॅकइनमुळे मोठा घोळ… लसीकरणालाठी आलेल्यांना लस नसल्याचा सेंटरने लावला फलक… लोक हैराण…. बीकेसीत १८ ते ४४, ४५ चे पुढच्या वयोगटातील लोकांना कोविशिल्डचे डोज नाहीत…. ५० आॅनलाईन, ५० आॅफलाईन डोज मिळणार… कोवॅक्सिनचा १८-४४ दुसरे १०० डोज… अनेकांची झाली विनाकारण पायपीट… मनपाकडून व्यवस्थित मार्गदर्शन होत नसल्याची तक्रार…

  • 25 Jun 2021 08:14 AM (IST)

    कोल्हापूर जिल्हा जुलै महिन्यात होणार ऑक्सिजनसाठी स्वयंपूर्ण

    कोल्हापूर :

    कोल्हापूर जिल्हा जुलै महिन्यात होणार ऑक्सिजनसाठी स्वयंपूर्ण

    हवेतून ऑक्सीजन निर्मितीच्या 12 प्रकल्पांचा 70 टक्के काम पूर्ण

    जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात हैदराबाद मधील ठेकेदाराकडून बसवली जाणार मशिनरी

    प्रकल्प कार्यान्वित होताच रोज आठ हजार 721 एलपीएम ऑक्सिजन होणार तयार

    बारा प्रकल्पांसाठी साडेअकरा कोटीहून अधिक चा खर्च

  • 25 Jun 2021 07:54 AM (IST)

    कोल्हापूरसह सात जिल्ह्यात निर्बंध शिथिल करायला घाई गडबड नको, मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

    कोल्हापूर :

    कोल्हापूरसह सात जिल्ह्यात निर्बंध शिथिल करायला घाई गडबड नको

    मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

    मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी सोमवारी दुकान उघडण्या वर ठाम

    सराफी दुकानासह अन्य दुकान कोणत्याही परिस्थितीत घडणारच

    व्यापारी संघाने दिला जिल्हा प्रशासनाला इशारा

    जिल्हा प्रशासन आणि व्यापाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी

    गेल्या 80 दिवसापासून दुकाना बंद असल्याने हवालदिल झालेले व्यापारी आता आक्रमक पवित्र्यात

  • 25 Jun 2021 07:43 AM (IST)

    कोरोना लसीकरणासाठी औरंगाबाद महापालिकेचा महत्वपूर्ण निर्णय, 200 जणांची यादी आल्यास थेट सोसायटीत करणार लसीकरण

    औरंगाबाद -

    कोरोना लसीकरणासाठी औरंगाबाद महापालिकेचा महत्वपूर्ण निर्णय

    200 जणांची यादी आल्यास थेट सोसायटीत करणार लसीकरण

    लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी आता थेट सोसायटीत लसीकरण

    महापालिकेचे पथक थेट सोसायटीत जाऊन करणार लसीकरण

    फक्त किमान 200 लोकांच्या लसीकरणाची महापालिकेची अट

    लसीकरणासाठी सोसायट्यांनी संपर्क करण्याचे महापालिकेचे आवाहन

  • 25 Jun 2021 07:13 AM (IST)

    नागपूर महानगरपालीकेच्या केंद्रांवरील लसीकरण आज बंद

    - नागपूर महानगरपालीकेच्या केंद्रांवरील लसीकरण आज बंद

    - कोव्हिशिल्ड लसीचा साठा उपलब्ध न झाल्याने लसीकरण बंद

    - सर्व वयोगटासाठी लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय

    - डागा, मेयो आणि एम्स या शासकीय केंद्रांवर सुरु राहिल लसीकरण

  • 25 Jun 2021 06:49 AM (IST)

    राज्यात कालच्या दिवसभरात 9 हजार 844 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 197 जणांचा मृत्यू

    राज्यात कालच्या दिवसभरात 9 हजार 844 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

    तर 9 हजार 371 रुग्णांची कोरोनावर मात

    तर 197 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला

  • 25 Jun 2021 06:48 AM (IST)

    कोरोनामुक्तांना दुसऱ्या डोसची गरज नाही, ICMR च्या संशोधनात माहिती समोर

    कोरोनामुक्तांना दुसऱ्या डोसची गरज नाही, ICMR च्या संशोधनात माहिती समोर

    कोरोनामुक्तांमध्ये अँटिबॉडीज तयार होतात

    18 ते 75 वयोगटातील 135 नागरिकांचा अँटिबॉडीज टेस्टचा अभ्यास करुन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे

Published On - Jun 25,2021 6:30 AM

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.