Maharashtra Coronavirus LIVE Update : दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले नाहीत, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा दावा

| Updated on: Jul 22, 2021 | 1:03 AM

कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 

Maharashtra Coronavirus LIVE Update : दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले नाहीत, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा दावा
CORONA latest cases

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. काल दिवसभरात राज्यात 6,910 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व नवीन 7,510 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 60,00,911 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 94,593 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.33% झाले आहे. कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi July 21 2021 Daily City District Wise Covid 20 Vaccine Tracker Delta Plus variant Unlock Updates

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 Jul 2021 03:48 PM (IST)

    दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले नाहीत, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा दावा

    दुसऱ्या लाटेमध्ये जे मृत्यू झाले आहेत ते ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाले नाहीत, असा खुलासा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. आपण ऑक्सिजन बाबतीत जागरूक असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

  • 21 Jul 2021 01:10 PM (IST)

    कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद

    – कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद

    – जिल्ह्यात तब्बल 17 लाखा हुन अधिक नागरिकांच झालं लसीकरण

    – पहिला डोस – 13 लाख 2 हजार 397 नागरिकांनी घेतला

    – दुसरा डोस – 3 लाख 98 हजार 101 नागरिकांनी घेतला

    – ग्रामीण भागात ही लसीकरनाला वेग

  • 21 Jul 2021 11:23 AM (IST)

    औरंगाबाद शहरात आज पुन्हा लसींचा ठणठणाट

    औरंगाबाद -

    औरंगाबाद शहरात आज पुन्हा लसींचा ठणठणाट

    औरंगाबाद शहरातील सर्वच लसीकरण केंद्र राहणार बंद

    लस टंचाई मुळे औरंगाबाद शहर जिल्ह्यातील 20 लाख नागरिक वेटिंगवर

    तर तब्बल 61 हजार नागरिकांची दुसऱ्या डोस साठी उडतेय तारांबळ

    लस मिळत नसल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिक हवालदिल

  • 21 Jul 2021 11:23 AM (IST)

    सोलापुरात चार दिवसांपासून लसीकरण मोहिम ठप्प

    सोलापूर -

    चार दिवसांपासून लसीकरण मोहिम ठप्प

    लसीकरण केंद्रावर लसीसाठी येरझारे

  • 21 Jul 2021 10:53 AM (IST)

    देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये तब्बल 12 हजारांनी वाढ, 24 तासात 42 हजार 15 नव्या रुग्णांची नोंद

    गेल्या 24 तासात भारतात 42 हजार 15 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे

    तर 3 हजार 998 रुग्णांना प्राण गमवावे लागले

    कालच्या दिवसात देशात 36 हजार 977 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले

  • 21 Jul 2021 08:31 AM (IST)

    सोलापूर ग्रामीणमध्ये 638 जणांना कोरोनाची लागण, 7 जणांचा मृत्यू

    सोलापूर - 24 तासात ग्रामीणमध्ये  638 जणांचा कोरोना अहवाल पोजिटिव्ह

    तर 7 जणांचा कोरोनाने  मृत्यू

    ग्रामीण भागातील बाधितांचा  आकडा 1 लाख 42 हजार 681 वर

    तर आत्तापर्यंत 3 हजार 70 जणांचा मृत्यू

    3 हजार 161 सक्रिय रुग्णावर  विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

    कोरोना बरोबरच म्युकरमायकोसिसच्या 48 रुग्णांवर उपचार सुरू

    तर 24 तासात दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू

    आत्तापर्यंत म्युकर मायकोसिसने 85 जणांचा मृत्यू

  • 21 Jul 2021 08:30 AM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल 10 लाख 28 हजार 378 जणांचे लसीकरण

    औरंगाबाद  :-

    औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल 10 लाख 28 हजार 378 जणांचे झाले लसीकरण

    पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या पोचली 10 लाखावर

    टंचाई काळातही लसीकरण मोहिमेत औरंगाबाद जिल्ह्याने घेतली आघाडी

    तिसरी लाट रोखण्यासाठी औरंगाबाद जिल्हा लसीकरणातून झाला सज्ज

    10 लाखांच्या वर लसीकरण होऊनही औरंगाबाद जिल्ह्यात कमालीची लस टंचाई

    आणखी 20 लाख नागरिक लसींच्या प्रतीक्षेत

  • 21 Jul 2021 08:28 AM (IST)

    वसई विरार महापालिकेत आज दिवसभर लसीकरण केंद्र बंद

    वसई विरार महापालिका हद्दीत आज दिवसभरासाठी लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले आहेत.

    महापालिका हद्दीत 16 जुलै पर्यंत 2 लाख 95 हजार 992 जणांनी लसीकर घेतले आहे. यातील 2 लाख 25 हजार 811 जणांनी पहिला डोस तर 65 हजार 181 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

    जस जसा लसीचा साठा उपलब्ध होतो तसे महापालिका लसीकरण केंद्रावर लस पुरवठा केल्या जाते. काल लसीकरणाचा साठा शासनाकडून आला नसल्याने हे लसीकरण बंद ठेवले आहेत.

  • 21 Jul 2021 08:02 AM (IST)

    सोलापूर शहर जिल्ह्यासाठी आज दुपारी मिळणार कोरोना प्रतिबंधक लस

    सोलापूर -

    शहर जिल्ह्यासाठी आज दुपारी मिळणार कोरोना प्रतिबंधक लस

    उद्यापासून होणार लसीकरण मोहिमेला पुन्हा सुरुवात

    जिल्ह्याला गेल्या चार दिवसांपासून लसीचा पुरवठा झाला नाही

    परिणाम म्हणून सर्व केंद्रावर लसीकरण मोहीम झाली आहे ठप्प

    आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून आज दुपारी होणार लस प्राप्त

    मात्र किती लसी मिळणार याबाबत स्पष्टता नाही

  • 21 Jul 2021 07:44 AM (IST)

    नागपुरात आजारी वृद्धांचे आता घरीच होणार कोरोना लसीकरण

    - नागपुरात आजारी वृद्धांचे आता घरीच होणार कोरोना लसीकरण

    - नागपूर महानगरपालिका राबवणार विशेष मोहिम

    - महानगरपालिकेचे पथक आजारी वृद्धाला घरी जाऊन देणार लस

    - घरी वृद्धांच्या लसीकरणासाठी मनपाच्या लिंकवर नोंदणी आवश्यक

    - नागपूरात कोरोना लसीकरणाची गती वाढवण्यासाठी प्रयत्न

  • 21 Jul 2021 07:12 AM (IST)

    नागपूर जिल्हयात 18 ते 44 वयोगटातील 13 टक्के तरुणांचं लसीकरण

    - नागपूर जिल्हयात 18 ते 44 वयोगटातील 13 टक्के तरुणांचं लसीकरण

    - महिनाभरात 18 ते 44 वयोगटातील 5 लाख 45 जणांचं लसीकरण

    - 21 जून ते 21 जुलै महिनाभरात एकूण डोस ची संख्या दुप्पट

    - डेल्टा प्लसच्या पार्श्वभुमिवर लसीकरणाचा वेग वाढवणं गरजेचं

  • 21 Jul 2021 06:58 AM (IST)

    राज्यात गेल्या 24 तासांत 6,910 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली

    राज्यात गेल्या 24 तासांत 6,910 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली

    गेल्या 24 तासांत नवीन 7,510 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत

    एकूण 60,00,911 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत

    राज्यात एकूण 94,593 सक्रिय रुग्ण आहेत

    राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.33% झाले आहे

Published On - Jul 21,2021 6:34 AM

Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.