Corona : राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांना कोरोनाची लागण

राज्याचे प्रधान सचिव संजयकुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे (Corona infected chief secretary Maharashtra).

Corona : राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांना कोरोनाची लागण

मुंबई : राज्याचे प्रधान सचिव संजयकुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे (Corona infected chief secretary Maharashtra). मागील काही महिन्यात मंत्रालयातील अनेक मंत्र्यांच्या दालनातील अधिकारी आणि मंत्र्यांनाही कोरानाची लागण झालेली आहे. त्यानंतर आता संजयकुमार यांनाही कोरोना झाला आहे.  काल (27 सप्टेंबर) रात्री मुख्य सचिवांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला (Corona infected chief secretary Maharashtra).

मुख्य सचिवांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची खबरदारी म्हणून नुकतीच कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात एक जण कोरोना पॉझिटीव्ह आल्याने मुख्य सचिवांनी आपली ही चाचणी करून घेतली. त्यात त्यांचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला आहे. मात्र सचिव कार्यालयात इतर कोणीही कोरोना पॉझिटीव्ह नसल्याचे सांगण्यात येते.

मागील काही दिवसांमध्ये मुख्य सचिवांनी मंत्रालयात विविध नियोजनासंदर्भात अनेक बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांचा अनेक अधिकाऱ्यांशी संपर्क आला असल्याचे बोललं जात आहे. तुर्तास त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नसल्याने सध्या ते कालपासूनच आपल्या निवासस्थानी क्वारंटाईन आहेत. तसचे कालपासूनच आपल्या निवासस्थानातूनच कामकाज सुरू केले असून आपली तब्येत अगदी ठणठणीत असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्रालयात शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागातील तब्बल डझनभराहून अधिक अधिकारी- कर्मचारी हे कोरोना पॉझिटीव्ह झाल्याचे समोर आले होते. तर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ हे आठवड्यापूर्वी कोरोना पॉझिटीव्ह निघाल्याने त्यांची मंत्रालयातील दालनेही बंद ठेवण्यात आली आहेत. आता राज्याचे प्रधान सचिवच कोरोना पॉझिटीव्ह निघाल्याने या कार्यालयातील अनेक अधिकाऱ्यांनाही क्वारंटाईन व्हावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या :

Corona Update | देशात 11 दिवसात 10 लाख रुग्ण कोरोनामुक्त

Corona Update | महाराष्ट्राचे कॉंग्रेस प्रभारी एच.के.पाटील यांना कोरोनाची लागण

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *